Good Morning Marathi Message: एखाद्याचा दिवस खास बनवल्याने तुमचा दिवस आपोआप खास बनतो. अशा वेळी जर तुम्ही सकाळी लवकर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना चांगले मेसेज पाठवले तर त्यांच्यासोबत तुम्हालाही आनंद मिळतो. हे शक्य आहे की, आपल्या चांगल्या विचारांसह सकाळच्या शुभेच्छा पाठवून, इतर व्यक्तीचा दिवस देखील चांगला जाईल अशी अपेक्षा करणे. तुम्हालाही तुमच्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात सुंदर करायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पाठवू शकता.
''५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने
जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,
तर जरा विचार करून पहा
नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल''
''कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात''
''धुक्याने एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…''
शुभ सकाळ!
''सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..
पण सत्य कधीच हरत नाही''
शुभ सकाळ!
''आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही''
शुभ सकाळ!
''सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.''
शुभ सकाळ! ''
''बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये''
सुप्रभात!
''दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा''
सुप्रभात!
''आपुलकी असेल तर जिवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवनी सुंदर''
सुप्रभात!
''सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच होतो''
गुड मॉर्निंग!