Good Morning Wishes : प्रत्येक सकाळ ही एक नवी सुरुवात… सुंदर सकाळच्या द्या खास अंदाजात शुभेच्छा!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : प्रत्येक सकाळ ही एक नवी सुरुवात… सुंदर सकाळच्या द्या खास अंदाजात शुभेच्छा!

Good Morning Wishes : प्रत्येक सकाळ ही एक नवी सुरुवात… सुंदर सकाळच्या द्या खास अंदाजात शुभेच्छा!

Published Oct 20, 2024 07:35 AM IST

Good Morning Wishes In Marathi:जर तुम्हाला स्वत:सह इतरांसाठीही दिवस आनंदी बनवायचा असेल तर, हे मेसेज पाठवून त्यांना सकाळच्या शुभेच्छा द्या.

Good Morning Wishes:‘हे’ मेसेज पाठवून प्रियजनांना शुभ सकाळ म्हणा!
Good Morning Wishes:‘हे’ मेसेज पाठवून प्रियजनांना शुभ सकाळ म्हणा!

Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हीही सकाळी तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना सुंदर सकाळच्या शुभेच्छा देण्यासाठी मोटिव्हेशनल गुड मॉर्निंग मेसेज पाठवत असाल तर, ते तुम्हाला मानसिक शांती तर देईलच, शिवाय समोरच्या व्यक्तीला आयुष्याचा नवा धडाही देईल. अशावेळी जर तुम्हाला स्वत:सह इतरांसाठीही दिवस आनंदी बनवायचा असेल तर, हे मेसेज पाठवून त्यांना सकाळच्या शुभेच्छा द्या.

 

स्वभाव अशी गोष्ट आहे, 

जी नेहमी तुम्हाला सर्वांचा प्रिय बनवते,

कितीही कोणापासून दूर व्हा, 

परंतु चांगल्या स्वभावामुळे

कोणत्या ना कोणत्या क्षणी,

तुमची आठवण होतच असते म्हणूनच,

स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.

 

 

आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं, 

त्यामुळे चांगलं द्या,

चांगलंच मिळेल.

शुभ सकाळ

 

 

दिवा कधीच बोलत नाही,

त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो,

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका,

चांगले कर्म करत रहा,

तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील!

शुभ सकाळ

 

 

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध

हा येणारच, आणि आपली

माणसे किती लांब असली

तरी आठवण ही येणारच…

शुभ सकाळ

 

 

आवडतं मला त्या लोकांना

सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला

जे माझ्या समोर नसून सुद्धा

माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.

शुभ सकाळ

 

 

माझ्यामागे कोण काय बोलतं

याने मला काहीच फरक पडत नाही,

माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची

हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

 

 

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,

पण चालणारे आपण एकटेच असतो,

पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,

पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

शुभ सकाळ!

 

 

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..

कारण उत्तम दिवस आठवणी देतात,

चांगले दिवस आनंद देतात,

वाईट दिवस अनुभव देतात,

तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात!

शुभ सकाळ!

 

 

सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात

काही फक्त पहायची असतात…

कधी कधी त्यात रंग भरायचे असतात

पण स्वप्न पूर्ण झालं नाही तर दु:खी व्हायचं नसतं..

रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं,

फक्त लक्षात ठेवायचं असतं

सर्वच काही आपलं नसतं.

शुभ सकाळ!

 

 

नारळ आणि माणूस

दर्शनी कितीही चांगले

असले तरीही नारळ

फोडल्या शिवाय आणि

माणूस जोडल्याशिवाय

कळत नाही!

शुभ सकाळ

 

 

मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला

कोणत्याही नावाची गरज नसते.

न सांगता जुळणाऱ्या नात्यांची

परिभाषा काही वेगळीच असते.

Whats_app_banner