Good Morning Wishes : नव्या दिवसाचं स्वागत करा प्रेरणादायी विचारांनी! जवळच्या मित्रपरिवाराला म्हणा गुड मॉर्निंग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : नव्या दिवसाचं स्वागत करा प्रेरणादायी विचारांनी! जवळच्या मित्रपरिवाराला म्हणा गुड मॉर्निंग

Good Morning Wishes : नव्या दिवसाचं स्वागत करा प्रेरणादायी विचारांनी! जवळच्या मित्रपरिवाराला म्हणा गुड मॉर्निंग

Jan 02, 2025 07:43 AM IST

Good Morning Wishes In Marathi : तुम्हालाही रोजचा दिवस इतरांसाठी खास बनवायचा असेल, तर त्यांना शुभ सकाळ म्हणणाऱ्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message (pixabay)

Good Morning Marathi Message: एखाद्या व्यक्तीला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते. तुम्हालाही रोजचा दिवस इतरांसाठी खास बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

 

आयुष्य खूप लहान आहे

प्रेमाने गोड बोलत रहा

धन-दौलत कोण कोणाला देत नसत

फक्त माणुसकी जपत रहा

प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा

तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन.

शुभ सकाळ!

 

 

कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,

कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने

प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं.

पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते.

मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,

या जगात नाते तर सर्वच जोडतात.

पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

 

 

स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,

कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे

कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच

स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.

शुभ सकाळ

 

दिवा कधीच बोलत नाही

त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका

चांगले कर्म करत रहा

तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील.

शुभ सकाळ

 

 

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध

हा येणारच, आणि आपली

माणसे किती लांब असली

तरी आठवण ही येणारच…

शुभ सकाळ

 

 

आपुलकी असेल तर जीवन सुंदर

फुले असतील तर बाग सुंदर

गालातल्या गालात एक छोटस हसु असेल

तर चेहरा सुंदर आणि

नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर

शुभ सकाळ

 

 

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात

पण चालणारे आपण एकटेच असतो,

पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,

पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

शुभ सकाळ!

 

 

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..

कारण उत्तम दिवस आठवणी देतात,

चांगले दिवस आनंद देतात,

वाईट दिवस अनुभव देतात,

तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!

 

 

छापलेली पुस्तके वाचल्याने

खरे ज्ञान मिळत नाही.

अनुभवाचे पुस्तक वाचल्याने

खरे ज्ञान मिळते, कारण

छापलेल्या पुस्तकांचे लेखक

अनेक असतात पण

अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक

आपण स्वत: असतो.

शुभ सकाळ

Whats_app_banner