Good Morning Wishes In Marathi : जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतं, तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी नवनवीन आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला सर्वोत्तम संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.
जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो...
जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो....
जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो...
आपण खरं बोलतो आणि स्पष्ट
बोलतो पण लोकांना आपला
राग येतो, खरंतर राग खोटं
बोलणाऱ्याचा यायला पाहिजे..
पण लोकांना खोटे जास्त आवडतं
म्हणून लोकं खरं बोलणाऱ्याचा
राग करतात.
शुभ सकाळ
देह सर्वांचा सारखाच,
फरक फक्त विचारांचा..
या छोटयाशा आयुष्यात
एवढे नाव कमवा की,
लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही,
एकमेव उपाय म्हणून पाहतील…
शुभ सकाळ
दोन वेळा गालावर
दोन वेळा ओठांवर
दोन वेळा कपाळावर
दोन वेळा डोळ्यांवर
वॅसलीन नेहमी लावा थंडी सुरू झाली
आहे ना..?
शुभ सकाळ
गोड माणसांच्या
आठवणींनी… आयुष्य
कस गोड बनतं.
दिवसाची सुरूवात
अशी गोड
झाल्यावर… नकळंत
ओठांवर हास्य खुलतं.
शुभ सकाळ
खरं बोलून मन
दुखावल तरी
चालेल.
पण खोट बोलून
आनंद देण्याचा
प्रयत्न करू नका…
सुप्रभात
मेसेज म्हणजे,
शब्दांचा एक खेळ,
विचारांची ओली-भेळ,
मनाशी मनाचा मेळ,
आणि कोणीतरी
कोणासाठी तरी जाणुन बुजून
काढलेला थोडासा वेळ.
!! शुभ सकाळ !!
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा.
विश्वास…
हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो
विचार करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य
लागते.
शुभ सकाळ
माणसाजवळ धन नसलं
तरी चालेल पण प्रेमाने
काठोकाठ भरलेलं एक मन
नक्कीच असावं..
शुभ सकाळ!
स्वत:साठी सुंदर घर करण्याचं
स्वप्न तर सगळेच पाहतात.
परंतु एखाद्याच्या मनात घर करणं
यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही.
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा…!
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी..!
शुभ सकाळ !