Good Morning Wishes: ‘हे’ सुंदर गुड मॉर्निंग मेसेज करतील तुमच्या दिवसाची आनंदमय सुरुवात!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: ‘हे’ सुंदर गुड मॉर्निंग मेसेज करतील तुमच्या दिवसाची आनंदमय सुरुवात!

Good Morning Wishes: ‘हे’ सुंदर गुड मॉर्निंग मेसेज करतील तुमच्या दिवसाची आनंदमय सुरुवात!

Jul 09, 2024 05:00 AM IST

Good Morning Wishes: रोज काही सकारात्मक आणि आनंदी विचार वाचून तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाऊ शकतो. अशाच काही चांगल्या विचारांचे गुड मॉर्निंग मेसेज तुम्ही आपल्या प्रियजनांना देखील पाठवू शकता.

Good Morning Wishes
Good Morning Wishes

Good Morning Wishes In Marathi: तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश पसरवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी रोज काही सकारात्मक आणि आनंदी विचार घेऊन येत आहोत, जे वाचून तुमचाही संपूर्ण दिवस चांगला जाईल. पाहा, चांगल्या विचारांचे गुड मॉर्निंग मेसेजेस…

 

वारे जर हवामानाची दिशा बदलू शकतात, 

तर प्रार्थनेमुळे अडचणीचे क्षणही बदलू शकतात!

गुड मॉर्निंग

 

प्रत्येक प्रार्थनेत आपण एवढंच म्हणतो की

जे आपल्या हृदयात आहेत, ते नेहमीच आनंदी राहोत!

गुड मॉर्निंग

 

निसर्ग आपल्याला जगण्याची संधी देतो,

हीच गोष्ट माणसाला माणुसकी शिकवते.

शुभ सकाळ

कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं,

पण त्याचा आपल्या स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा,

हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं!

सुप्रभात

 

घरात दिवे असूनही निरांजतून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो…

सहवासातील काही माणसांचंदेखील तसेच असतं!

शुभ सकाळ

 

प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत.

एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा.

कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही.

सुप्रभात

सुवास यांचा असा जशी पावसातील माती...

ऋणानुबंध म्हणावे की, रेशीमगाठी...

कुणी नाही कुणाचे तरीही जगतो एकमेकांसाठी…

गुड मॉर्निंग

 

अक्षर कितीही सुंदर असलं तरी,

सगळ्यात आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडेच लक्ष जातं, 

तसंच आपण कितीही चांगलं वागा, 

समोरचा आपल्या फक्त चुकाच शोधणार!

शुभ प्रभात 

 

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते

म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा

आयुष्य खूप आनंदात जाईल...

गुड मॉर्निंग

तेव्हा लक्षात ठेवा की

उड्डाण जमिनीवर नव्हे तर आकाशात होते.

गुड मॉर्निंग

 

शिक्षणाची सुरुवात कुठूनही होवू शकते, 

पण संस्कारांची सुरुवात घरूनच होते!

शुभ सकाळ

 

स्वप्न ती नसतात जी आपल्याला झोपल्यावर दिसू लागतात,

स्वप्न ती असतात जी आपल्याला झोप आली तरी झोपू देत नाहीत!

शुभ सकाळ

Whats_app_banner