Good Morning Wishes In Marathi: तुमच्या प्रियजनांनी सकाळी डोळे उघडताच तुम्ही पाठवलेला सुंदर संदेश वाचला तर त्यांचा दिवस नक्कीच जाईल. आपणही आपल्या दिवसाची सुरुवात चांगली केली पाहिजे आणि आपला संपूर्ण दिवस आनंदी ठेवला पाहिजे. या लेखातून आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग शायरी आणि संदेश घेऊन आलो आहोत. हे गुड मॉर्निंग शायरी संदेश केवळ आपलाच नव्हे, तर आपल्या प्रियजनांचा दिवसही सकारात्मक बनवू शकता. चला तर मग, या सुंदर गुड मॉर्निंगसह सकाळच्या सुखद प्रवासाला सुरुवात करूया…
तुमचा गेलेला दिवस कसा होता हे महत्त्वाचे नाही.
तुमचा आज खूप उज्ज्वल असणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा!
गुड मॉर्निंग
सकाळपासून नवीन दिवसाची सुरुवात होते,
आपल्या प्रियजनांबद्दल प्रत्येक गोष्ट खास असते,
जर आपण त्यांची मनापासून आठवण काढत असू,
तर आपल्यासोबत नेहमीची त्यांच्या प्रेमाची साथ असते!
गुड मॉर्निंग डिअर
देवाने तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आणखी एक नवीन दिवस दिला आहे.
तो मनापासून स्वीकारा आणि आपल्या आयुष्याचीही नवीन सुरुवात करा!
गुड मॉर्निंग!
काल रात्री तुम्ही जे स्वप्न पाहिले ते सर्व पूर्ण होवो.
या नव्या पहाटेसोबत तुमचा चेहरा आनंदी राहो!
शुभ सकाळ
जीवनातील आव्हाने स्वीकारायला शिका आणि
छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानायला शिका!
गुड मॉर्निंग
उद्या कितीही कठीण असला तरी लक्षात ठेवा की, आजचा दिवस तुमचा आहे.
आयुष्याच्या प्रत्येक क्षणात सकारात्मक आणि आनंदी राहा.
गुड मॉर्निंग
तुम्ही एखाद्या सुपरस्टारप्रमाणे उठून जगाला सांगा की,
तुम्हाला जे मिळायला हवं ते मिळेपर्यंत तुम्ही थांबणार नाही!
शुभ प्रभात
जबाबदारीची जाणीव असणारी माणसे
फारशी वाद-विवाद किंवा सवाल जवाबाच्या फंदात पडत नाहीत,
तर, समोरील काम अत्यंत महत्त्वाचे समजून उत्कृष्टतेसाठी सतत झिजत असतात!
म्हणूनच झिजणारे खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात!
सुप्रभात
सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते,
तर, दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते,
दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो,
तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो!
शुभ सकाळ
मालमत्तेचे वारस खूप सारे असू शकतात,
पण आपल्या कर्माचे वारस दुसरे कोणी नसून फक्त आपणच!
शुभ प्रभात
संबंधित बातम्या