Good Morning Wishes In Marathi: आयुष्यातील अपयशामुळे व्यक्तीचे मनोबल हळूहळू तुटू लागते, अशा वेळी दुसऱ्या व्यक्तीचा सल्ला देखील आनंद आणि धाडस देऊ शकत नाही, जो एका चांगल्या विचाराने तुम्हाला मिळू शकतो. आपल्या जीवनात शांतता हवी असेल, तर संघर्षाच्या वेळी इतरांबद्दल तक्रार करण्यापेक्षा स्वत:मध्ये बदल करणे चांगले. लक्षात ठेवा, जगभरात कार्पेट घालण्यापेक्षा आपल्या पायात चप्पल घालणे सोपे आहे. थोडक्यात सांगायचे, तर जे मिळेल त्यात आनंदी रहा आणि दररोज चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जात राहा. तुमची स्वप्नं पूर्ण करण्याची ही आवड आणि पॅशन भरून काढण्यासाठी आम्ही काही सुंदर गुड मॉर्निंग कोट्स घेऊन आलो आहोत, जे वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वप्नांना नवी भरारी देऊ शकता.
आयुष्य समजून घ्यायचं असेल
तर मागे वळून बघा,
आयुष्य जगायचं असेल
तर पुढे बघा!
शुभ प्रभात
---------------------------
आपल्या आयुष्यात विनाकारण समस्या येत नाहीत,
समस्यांचे येणे म्हणजे आपल्या आयुष्यात
काहीतरी बदल घडण्याचे लक्षण आहे!
---------------------------
ही सकाळ जेवढी सुंदर आहे,
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो,
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
---------------------------
पानगळ झाल्याशिवाय झाडाला
नवीन पालवी येत नाही,
त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा
सामना केल्याशिवाय चांगले
दिवस येत नाहीत…
शुभ सकाळ
---------------------------
हसून पहावं, रडून पहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे
भरून पहावं माणसावर करावं,
माणुसकीवर करावं प्रेम करावं
तर मनापासून करावं…
---------------------------
जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल
तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता,
तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करा..
शुभ सकाळ
---------------------------
विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले करत असतो,तेव्हा
आपल्यासाठी सुध्दा कुठेतरी काही
चांगल घडत असत…
शुभ प्रभात
---------------------------
जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो,
तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.
शुभ सकाळ
---------------------------
हसत राहिलात तर सर्व
जण आपल्याबरोबर आहे…
नाहीतर डोळ्यातील अश्रूंना
पण डोळ्यांमध्ये जागा नाही मिळत.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
---------------------------
तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा
आणि दुःखाचा अंदाज लावतात…