Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल,
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल....
आपला दिवस शुभ असो!
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
शुभ सकाळ!
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
सुप्रभात!
आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा
प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन.
कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने
प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं.
पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते.
मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सर्वच जोडतात.
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
शुभ सकाळ
दिवा कधीच बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका
चांगले कर्म करत रहा
तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील.
शुभ सकाळ!
मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध
हा येणारच, आणि आपली
माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच…
आवडतं मला त्या लोकांना
सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला
जे माझ्या समोर नसून सुध्दा
माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.
शुभ सकाळ
संबंधित बातम्या