Good Morning Wishes In Marathi : तुम्ही आपल्या प्रियजनांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यासाठी चांगला संदेश शोधत आहात का? तर, तुमचा शोध इथे थांबणार आहे. आम्ही तुमच्यासाठी काही खास गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. आपल्या जवळचे मित्र आणि आप्तस्वकीय आपल्यासाठी किती खास आहेत, हे तुम्ही या मेसेजेसमधून त्यांना नक्कीच सांगू शकता. पाहा ‘हे’ खास मेसेज...
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.
योग्य व्यक्तीचे हात हातात असतील,
तर आयुष्यात चुकीच्या माणसांचे
पाय धरायची वेळ कधीच येत नाही!
शुभ सकाळ
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते!
गुड मॉर्निंग
आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय,
पांढऱ्या धुक्यातून सूर्य वर आलाय,
माझ्या मनात आनंदाचं सुंगध दरवळलाय,
कारण तुम्हाला भेटण्यासाठी आज पुन्हा नवा दिवस उगवलाय!
शुभ सकाळ
चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपले भाग्य असते.
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपून ठेवण्यासाठी आपल्याला
तितके योग्य असायला लागते.
शुभ सकाळ
रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्यही चमकला,
लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली
तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली!
गुड मॉर्निंग
लोक म्हणतात तू नेहमी
आनंदी असतोस….
मी म्हणालो दुसऱ्याच सुख
बघून मी जळत नाही,
आणि माझं दुःख कुणाला
सांगत नाही.
शुभ सकाळ
मैत्रीचा मोती प्रत्येकाच्या भाग्यात नसतो,
कारण समुद्रातही प्रत्येक शिंपल्यात तो नसतो,
जो नाती जपतो त्यांनाच तो सापडतो,
कारण खऱ्या मोत्यावर त्याचाच अधिकार असतो!
शुभ सकाळ
आपण खरं बोलतो आणि स्पष्ट बोलतो
पण लोकांना आपला राग येतो,
खरंतर राग खोटं
बोलणाऱ्याचा यायला पाहिजे..
पण लोकांना खोटे जास्त आवडतं
म्हणून लोकं खरं बोलणाऱ्याचा
राग करतात.
शुभ सकाळ
जसे आहात तसेच रहा.
नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर
आयुष्य कमी पडेल.
मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली
स्पंदने निरपेक्ष असली की,
कुठल्याही नात्याच्या धाग्यात
विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले
जातात.
शुभ सकाळ
संबंधित बातम्या