Good Morning Wishes : कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे! 'हे' मेसेज पाठवून करा सकाळची सुरुवात
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे! 'हे' मेसेज पाठवून करा सकाळची सुरुवात

Good Morning Wishes : कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे! 'हे' मेसेज पाठवून करा सकाळची सुरुवात

Dec 21, 2024 07:30 AM IST

Good Morning Wishes In Marathi: सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो.

Good Morning marathi Status:
Good Morning marathi Status: (freepik)

Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी

बॉम्ब सारखा असला पाहिजे

वाजला तर एकदम जोरात

नाही वाजला तरी जवळ यायची

कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे

 

 

विश्वास ठेवा,

आपण जेव्हा कोणासाठी

काही चांगले करत असतो,

तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,

कुठेतरी काही चांगले घडत असते…

शुभ सकाळ!

 

 

कुणीही चोरू शकत नाही

अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..

ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…

शुभ सकाळ!

 

 

आयुष्य खूप सुंदर आहे,

उतुंग भरारी मारा,

ढगा आढ उडणाऱ्या गरूडाला

पण तुमचा हेवा वाटला पाहिजे

इतके मोठे व्हा, आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत

शुभ सकाळ

 

 

शिस्तीशिवाय जीवन म्हणजे

देवावीनं देऊळ

सुंदर दिवसाची पहाट,

सुंदर विचाराने

शुभ सकाळ

 

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे

आपल्याजवळ असतात

तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी

त्याच्या वेदना जाणवत नाहीत

शुभ सकाळ

 

 

कोणी कितीही घेरलं तरी

स्वतःचे अस्तित्व

स्वतः निर्माण करता यायला पाहिजे

शुभ सकाळ

 

 

सुंदर दिवसाची सुरुवात,

नाजुक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.

शुभ सकाळ

 

 

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,

फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि

सूर्याच्या कोमल किरणांनी,

हि सकाळ आपल स्वागतं करत आहे

शुभ सकाळ

 

 

अडचणी आयुष्यात नव्हे .तर मनात असतात.

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल

त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…

आपला दिवस शुभ असो

 

 

प्रेमाच्या पाझरांची वाहती

एक सरीता,

नात्यांच्या अतुट शब्दांनी

गुंफलेली कविता,

जाणिवेच्या पलीकडच

जगावेगळ गाव,

यालाच तर आहे “आयुष्य” हे नाव

तुमचा दिवस सुखाचा जावो

शुभ सकाळ!

Whats_app_banner