Good Morning Wishes: रोजच्या दिवसाची करा नव्याने फ्रेश सुरुवात! जवळच्या लोकांना पाठवा ‘हे’ खास मेसेज
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: रोजच्या दिवसाची करा नव्याने फ्रेश सुरुवात! जवळच्या लोकांना पाठवा ‘हे’ खास मेसेज

Good Morning Wishes: रोजच्या दिवसाची करा नव्याने फ्रेश सुरुवात! जवळच्या लोकांना पाठवा ‘हे’ खास मेसेज

Published Jul 12, 2024 05:00 AM IST

Good Morning Wishes In Marathi: आपल्यासोबतच आपल्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात देखील छान विचारांनी करायला हवी. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना ‘हे’ मेसेज पाठवू शकता.

Good Morning Wishes In Marathi
Good Morning Wishes In Marathi

Good Morning Wishes In Marathi: रोजचा नवा दिवस आपल्या सगळ्यांसाठी एक नवी संधी घेऊन येतो. या नव्या संधीचे स्वागत अतिशय आनंदाने करायला हवे. दिवसाची सुरुवात आनंदाने झाली तर, दिवसभरातील कामे देखील अतिशय उत्साहाने होतात. अशा आपल्या नव्या दिवसाची सुरुवात ही नव्या आणि चांगल्या विचारांनीच करायला हवी. आपल्यासोबतच आपल्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात देखील अशाच छान विचारांनी करायला हवी. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना ‘हे’ मेसेज पाठवू शकता.

 

कळत नकळत कधी जुळतात नाती ...

सुवास यांचा असा जशी पावसातील माती ...

ऋणानुबंध म्हणावे की रेशीमगाठी...

कुणी नाही कुणाचे तरीही जगतो एकमेकांसाठी...

शुभ सकाळ

 

अक्षर कितीही सुंदर असलं तरी सगळ्यात आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडेच लक्ष जातं,

तसंच आपण कितीही चांगलं वागा समोरच्या व्यक्तीचं लक्ष आपल्या चुकांकडेच जातं!

गुड मॉर्निंग

ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात,

त्याच नात्यांना खरा अर्थ असतो!

बाकीची नाती फक्त माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात!

शुभ प्रभात

 

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते,

तो कुठल्याही काळोखातून सहज मार्ग काढतो.

सुप्रभात

 

यश मिळवण्यासाठी इतरांना हरवण्याची किंवा जिंकण्याची गरज नाही,

आपल्या सारखी चांगली आपली माणसं सोबत असणं म्हणजे जीवनातील स्पर्धा जिंकल्यासारखी आहे!

शुभ सकाळ

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून,

ते अंतःकरणाची संपत्ती आहे.

ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो,

दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही,

आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही!

शुभ सकाळ

 

एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात कधीही नवीन सुरूवात करायला घाबरू नका.

त्यासाठी मुहूर्त नाही तर जिद्द महत्त्वाची असते.

दुसऱ्याचे निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरिक्षण केलेले कधीही चांगले!

शुभ प्रभात!

जे दुसर्‍यांना अंधारात ठेवून आपलं घर सजवतात,

एक दिवस तोच अंधार त्यांचा प्रकाश हिरावून घेतो!

शुभ सकाळ!

 

जबाबदारीची जाणीव असणारी माणसे फारशी वाद-विवाद किंवा

सवाल जवाबाच्या फंदात पडत नाहीत,

तर, समोरील काम अत्यंत महत्त्वाचे समजून उत्कृष्टतेसाठी सतत झिजत असतात.

म्हणूनच झिजणारे खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात!

गुड मॉर्निंग

Whats_app_banner