Good Morning Wishes : आठवड्याची सुरुवात करा प्रेरणादायी विचारांनी; प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास मेसेज
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : आठवड्याची सुरुवात करा प्रेरणादायी विचारांनी; प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास मेसेज

Good Morning Wishes : आठवड्याची सुरुवात करा प्रेरणादायी विचारांनी; प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास मेसेज

Published Oct 21, 2024 07:36 AM IST

Good Morning Wishes In Marathi: एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियाजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर‘हे’ मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.

Good Morning marathi Status:
Good Morning marathi Status: (freepik)

Good Morning Wishes In Marathi: सोमवार असो किंवा मंगळवार दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वीही आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियाजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर ‘हे’ मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.

 

कळत नकळत कधी जुळतात नाती ...

सुवास यांचा असा जशी पावसातील माती ...

ऋणानुबंध म्हणावे की रेशीमगाठी ...

कुणी नाही कुणाचे तरीही जगतो एकमेकांसाठी!

 

---------------------------------

 

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल, 

पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.

शुभ सकाळ

 

---------------------------------

 

श्रेष्ठ व्यक्ती ही बोलण्यात संयमी, 

पण कार्य करण्यात अग्रेसर असते.

शुभ सकाळ

 

---------------------------------

 

लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही, 

तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही जुळत नाही.

शुभ सकाळ

 

---------------------------------

 

अपयशाच्या भीती पेक्षा, 

यश मिळण्याची इच्छाशक्ती, 

अधिक प्रबळ असली पाहिजे.

शुभ सकाळ

 

---------------------------------

 

डोक शांत असेल तर, 

निर्णय चुकत नाहीत. 

अन् भाषा गोड असेल तर, 

माणसं तुटत नाहीत.

शुभ सकाळ 

 

---------------------------------

 

वर्तमान हाच सर्वात चांगला क्षण म्हणून साजरे करा, 

कारण तो कधीच परत येत नाही.

शुभ सकाळ 

 

---------------------------------

 

तुम्हाला तुमची किंमत माहित नसेल, 

तर इतरांनी तिची दखल घ्यावी, 

ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

शुभ सकाळ

 

---------------------------------

 

सिंह बनून जन्माला आले तरी, 

स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते, 

कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही.

शुभ सकाळ

 

---------------------------------

 

कधीही कुणाचा हक्क हिरावून घेऊ नये. 

जे दुसऱ्यांचा हक्क हिसकावतात, 

त्यांना कधीही कुठेच सन्मान मिळत नाही.

 

---------------------------------

 

आपले यश हे इच्छाशक्ती, 

स्वप्न आणि अपयशातून बाहेर पडण्याची मानसिक स्थिती, 

यावर अवलंबून असते.

शुभ सकाळ

 

Whats_app_banner