Good Morning Marathi Message: जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो, तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी नवनवीन आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला 10 सुंदर संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता. शिवाय या संदेशांद्वारे त्यांचा दिवस सकारात्मक बनवू शकता.चला तर मग पाहूया.....
छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही.
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते, कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात पण
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो.
आयुष्यात काही आठवणी विसरता येत नाहीत आणि
काही तोडता येत नाहीत.
जीवनात माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत…
सकाळच्या सुंदर शुभेच्छा
मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते.
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषा काही वेगळीच असते.
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.
शुभ सकाळ!
आज एक नवीन दिवस आहे,
आणि त्याच्याबरोबर नवीन संधी देखील आहे.
प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घ्या
आणि तुमची सकाळ चांगली जावो.
शुभ सकाळ!
तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते !!
जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल
तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.
सुप्रभात!
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी !
शुभ सकाळ!
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची,
सकाळच्या सुंदर शुभेच्छा!
“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे.
शुभ सकाळ !
आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
शुभ सकाळ!