Good Morning Wishes : हार मानण्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करणे चांगले; सकाळची सुरुवात करा 'या' प्रेरणादायी संदेशांनी!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : हार मानण्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करणे चांगले; सकाळची सुरुवात करा 'या' प्रेरणादायी संदेशांनी!

Good Morning Wishes : हार मानण्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करणे चांगले; सकाळची सुरुवात करा 'या' प्रेरणादायी संदेशांनी!

Dec 08, 2024 07:51 AM IST

Good Morning Wishes In Marathi : आपली आणि आपल्या प्रियजनांची सकाळ शुभ, सकारात्मक, हसरी आणि गोड करण्यासाठी खास संदेश पाठवू शकतात.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message (pixabay)

Good Morning Wishes In Marathi : प्रत्येक जण आपली सकाळ सकारात्मक, गोड आणि हसरी करण्यासाठी दिवसाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने करतो. सकाळी स्नानादी कार्य आटोपून सुंदर भक्तीमय संगीत ऐकले जाते. देवपूजा केली जाते. आजचा दिवस सुख-संपत्ती समाधानाचा जावो अशी देवाजवळ प्रार्थना केली जाते. परंतु, घाईगडबडीच्या जीवनात काहींची कामावर जाण्याची गडबड असते, देवासमोर नतमस्तक व्हायला वेळ मिळत नाही. जीवनात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतरच आपण आपले ध्येय गाठू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आयुष्यातील या चढउतारांना सामोरे जाताना कधीही हार मानू नये. ध्येय प्राप्तीसाठी प्रत्येक क्षणी प्रेरित राहणे अत्यंत आवश्यक आहे. तरच, आपल्याला आपल्या मार्गावर राहण्याचे बळ मिळते. तेव्हा आपली आणि आपल्या प्रियजनांची सकाळ शुभ, सकारात्मक, हसरी आणि गोड करण्यासाठी खास संदेश पाठवू शकतात.

हार मानण्यापेक्षा

पुन्हा प्रयत्न करणे चांगले,

शुभ सकाळ

 

 

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा

प्रामाणिकपणा सिद्ध होतो,

तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.

 

 

शुभ सकाळ म्हणजे केवळ,

शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,

दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,

काढलेली आठवण आहे…

शुभ सकाळ!

 

 

नाते सांभाळायचे असेल तर

चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,

आणि,नाते टिकवायचे असेल तर

नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..

शुभ सकाळ!

 

 

कधी भेटाल तिथे एक

स्माइल देऊन बोलायला विसरु नका..

कधी चूक झाल्यास माफ करा,

पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..

गुड मॉर्निंग'

 

स्वतःसाठी वेळ द्या, कारण

आपण आहोत तर जग आहे..

आणि अतिशय महत्वाचे,

दुसऱ्यासाठी वेळ द्या,

कारण ते नसतील तर

आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.

शुभ सकाळ

 

 

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,

यावरून त्याची किंमत होत नसते,

तो इतरांची किती किंमत करतो,

यावरून त्याची किंमत ठरत असते.

शुभ सकाळ

 

 

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे.

त्यापेक्षा जास्त खाणे

ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी

राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

शुभ सकाळ 

 

 

नाती तयार होतात

हेच खूप आहे,

सर्व आनंदी आहेत

हेच खूप आहे,

दर वेळी प्रत्येकाची

सोबत होईल असं नाही,

एकमेकांची आठवण

काढत आहोत हेच खूप आहे.

Whats_app_banner