Good Morning Wishes In Marathi: दिवसाची सुरुवात नेहमी उत्साहाने आणि नवीन उर्जेने करावी. प्रत्येक दिवस स्वतःमध्ये एक नवीन अनुभव आणि ऊर्जा घेऊन येतो. यामध्ये नवीन सकारात्मक गोष्टी असण्याची शक्यता असते. चांगली सुरुवात आपल्याला नव्या उंचीवर नेऊ शकते. गुड मॉर्निंगची सुरुवात जर चांगल्या विचारांनी होत असेल, तर आणखी काय हवे. शिवाय तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा हीच सकारात्मक ऊर्जा देऊ शकता. त्यासाठी त्यांना फक्त एका मेसेजसोबत गुड मॉर्निंग म्हणण्याची गरज आहे. तुमच्या एका मेसेजने एखाद्याचा दिवस चांगला होऊ शकतो. तुम्ही सोशल मीडियावर शुभ सकाळचे हे मेसेज तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलंच मिळेल.
सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…
शुभ सकाळ!
मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे.
शुभ सकाळ!
डोळ्यांतून वाहणारं पाणी,
कोणीतरी पाहणारं असावं..
हृदयातून येणार दु:ख,
कोणीतरी जाणणारं असावं..
शुभ सकाळ!
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त माणसे महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी...!
शुभ सकाळ!
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो...
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही माणसे
आयुष्यभर लक्षात राहतात...
शुभ सकाळ!
आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही...
शुभ सकाळ!
गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच..
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच...
शुभ सकाळ!
भविष्याची जराही कल्पना नसताना
आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन
करतो तोच खरा मनाचा
आत्मविश्वास
शुभ सकाळ
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो.
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो,
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच...
शुभ सकाळ!
स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे…
शुभ सकाळ!
चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही.
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या