Good Morning Marathi Message: कुणालाही चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचार असलेले सुप्रभात संदेश पाठवून समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते. तुम्हालाही तुमचा दिवस इतरांसारखा बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.
नवा दिवस नवी सुरूवात,
नवी प्रेरणा आणि तुझी साथ,
आयुष्य सुंदर आहे तुझा हात हातात आहे,
परमेश्वरा मी यासाठी कृतज्ञ आहे!
शुभ सकाळ
हे मतलबी युग चालू आहे,
इथे खरा माणुस झुरतो आणि खोटा मिरवतो,
पण लक्षात असुद्या एकदिवस कर्माचा हिशोब नक्की होतो!
दगडात एक कमतरता आहे की,
तो कधी वितळत नाही,
पण एक चांगलेपणा आहे की,
तो कधी बदलत नाही.
शुभ सकाळ
जिथे दान देण्याची सवय असते,
तिथे संपत्तीची कमी नसते आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत,
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत.
गुड मॉर्निंग
तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही,
अशी भीती कधीच बाळगु नका,
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा
गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते.
शुभ सकाळ
सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
शुभ प्रभात!
माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
शुभ सकाळ!
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
शुभ सकाळ!
एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या