Good Morning Wishes In Marathi: वार कुठलाही असो, दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वी आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर 'हे' मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.
आयुष्यात तुम्ही किती
आनंदी आहात ते महत्वाचं नाही...
तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत
याला महत्व आहे...
शुभ सकाळ
थोडेस प्रेम, थोडीशी आपुलकी,
थोडी काळजी, आणि थोडीशी
विचारपूस…
जीवनात आणखी काय हवं…?
मैत्रीला रंग नाही तरीही
ती रंगीत आहे . मैत्रीला
चेहरा नाही तरीही ती
सुंदर आहे . मैत्रीला घर
नाही म्हणूनच ती आपल्या
हृदयात आहे…
शुभ सकाळ
आयुष्यातला प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस प्रत्येक
सकाळ आपल्याला खूप
सुंदर जावो.
शुभ सकाळ
माणसाच्या मुखात गोडवा
मनात प्रेम …
वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरीबीची जाण असली
की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात.
गुड मॉर्निंग
बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर…!
कप म्हणाला बशीला
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन लावतात तुला ओठाला.!!
या चहा प्यायला!
शुभ सकाळ
तुमच्या जीवनातील
प्रत्येक सकाळ या
फुलासारखी बहरलेली
असावी
शुभ सकाळ
रस्त्याने जातांना
येणारी माझी शाळा मला
विचारते…
जीवनाची परीक्षा बरोबर
देतोयस ना ?
मी उत्तर दिले,
आता फक्त दफ्तर खांद्यावर नाही
एवढच बाकी…,
अजूनही लोक धडा शिकवून
जातात…
शुभ सकाळ
रानात खत…
बाजारात पत आणि
घरात एकमत
असणार्याचा संसार
नेहमी सुखाचा
होतो...
शुभ सकाळ
हिरवी झाडे जंगलात राहतात,
सुंदर फुले बागेत रहतात,
चंद्र तारे आकाशात रहातात,आणि
तुमच्यासारखी गोड माणसं
ह्रदयात रहातात…
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
उगवलेला हा दिवस
आपल्याला आनंदात्मक उत्साहवर्धक
आणि उत्तम आरोग्यदायक लाभो
शुभ सकाळ
तुमच्या आयुष्यात
येणारी प्रत्येक सकाळ
या फुलांसारखी
बहरलेली असो..
संबंधित बातम्या