Good Morning Marathi Message: कुणालाही चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचार असलेले सुप्रभात संदेश पाठवून समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते. तुम्हालाही तुमचा दिवस इतरांसारखा बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.
कोमलता हा हृदयाच्या धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म,
देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि
हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा.
----------------------------------
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरू होण्याची.
शुभ सकाळ
----------------------------------
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
शुभ सकाळ
----------------------------------
वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.
शुभ सकाळ
----------------------------------
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
शुभ सकाळ
----------------------------------
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला की,
सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
शुभ सकाळ
----------------------------------
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
शुभ सकाळ
----------------------------------
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
शुभ सकाळ
----------------------------------
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकं
स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील!
----------------------------------
आयुष्य हे असच जगायचं असतं
आपल्याकडे जे नाही
त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर केला की,
जग अपोआप सुंदर बनतं!
शुभ सकाळ
संबंधित बातम्या