Good Morning Wishes In Marathi : सकाळी उठल्यावर आपली सुरुवात सकारात्मक आणि सुंदर व्हावी, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पूर्वी लोक दैनंदीन कामे आटोपल्यानंतर स्नान करून पूजा-पाठ करायचे. मात्र, आता हातात पहिला फोन घेतला जातो. अशावेळी आलेला शुभ सकाळच्या शुभेच्छा देणारा मेसेज समोरच्या व्यक्तीत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आजकाल अनेक लोक सुंदर आणि आकर्षक गुड मॉर्निंग संदेश शोधत असतात. जेव्हा कोणी प्रेमाने शुभ सकाळ म्हणतो, तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक खास होते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात, कामावर जाताना आपल्याला कधी कधी घाईतच निघावे लागते. त्यामुळे उठल्यावर सर्वप्रथम मोबाईल हातात घेत, आपल्या प्रियजनांना हटके आणि खास अंदाजात ‘गुड मॉर्निंग’ म्हटले पाहिजे.
आपल्यात लपलेले परके,
आणि परक्यात लपलेले आपले,
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
हसता-खेळता घालवूया
दिवसाचा प्रत्येक क्षण
भगवंताच्या नामस्मरणाने
ठेवुया प्रसन्न मन
आनंदाने फुलवुया
जीवनाचा सुंदर मळा
सद्विचारांच्या रंगाने
रंगवूया मनाचा फळा
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ
सर्वांना शुभेच्छा
सुख-समाधान-शांती लाभो
हीच ईश्वर चरणी इच्छा.
हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंत जवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव ‘मैत्री’ असं असतं!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
तोंडी साखरेचा, गोडवा कायम असावा
मनात कुणाच्या, कधी राग नसावा
आयुष्यात जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून जावे व्यवहारी, फायदे तोटे
सुख क्षणांचे मणी, हळुवार प्रेमाने ओवावे,
आनंदी सुरांनी, मनास छेडावे.
शुभ सकाळ
मंदिरातील घंटेला आवाज नाही
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही,
कवितेला चाल नाही
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही,
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही,
शुभ सकाळ
मन वळू नये, अशी श्रध्दा हवी,
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी
सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी,
कधी विसरु नये, अशी नाती हवी
शुभ सकाळ
देवाकडे काही मागायचे,
असेल तर नेहमी आईचे स्वप्न,
पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा,
तुम्हाला कधी स्वत:साठी
काही मागायची गरज पडणार नाही.
शुभ सकाळ