Good Morning Wishes: ‘आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं’; सकाळची सुरुवात करा एका दमदार विचाराने!-good morning wishes in marathi start the morning with a powerful thought send these messages ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: ‘आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं’; सकाळची सुरुवात करा एका दमदार विचाराने!

Good Morning Wishes: ‘आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं’; सकाळची सुरुवात करा एका दमदार विचाराने!

Aug 15, 2024 05:00 AM IST

Good Morning Wishes In Marathi:डोळे उघडताच तुमचे मित्र,नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना तुम्ही त्यांची आठवण काढत आहात, याची नक्कीच जाणीव करून द्या.

Good Morning Wishes: ‘आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं’; सकाळची सुरुवात करा एका दमदार विचाराने!
Good Morning Wishes: ‘आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं’; सकाळची सुरुवात करा एका दमदार विचाराने! (Shutterstock )

Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणून सकाळची गोड सुरुवात करायची असेल, तर त्यांना तुमची आठवण आवर्जून करून द्या. डोळे उघडताच तुमचे मित्र, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना तुम्ही त्यांची आठवण काढत आहात, याची नक्कीच जाणीव करून द्या. यासाठी, सकाळी उठल्याबरोबर एक गोड सुंदर संदेश पाठवणे पुरेस आहे. डोळे उघडताच जेव्हा तुमचा जवळचा व्यक्ती त्याचा मोबाईल बघेल, तेव्हा तुमचा एक संदेश त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणेल. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. 

 

आपण जे देतो ते आपल्याकडे

परत येतं त्यामुळे चांगलं द्या,

चांगलंच मिळेल.

शुभ सकाळ.

 

--------------------------

 

चूक ही आयुष्याच पान आहे,

माफी ही त्या आयुष्याच पुस्तक आहे.

गरज पडली, तर चुकीचं पान फाडून टाका,

पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तक गमावू नका.

गुड मॉर्निंग!

 

--------------------------

 

तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते!

जर, आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल,

तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.

शुभ सकाळ

 

--------------------------

 

आनंदी राहण्याचा सुंदर उपाय

आशा देवाकडून ठेवा,

इतरांकडून नाही.

शुभ सकाळ

 

 

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात

नाजूक उन्हाची प्रेमळ साथ

मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल

अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ!

शुभ प्रभात

 

--------------------------

 

रात्र ओसरली दिवस उजाडला

तुम्हाला पाहून सूर्यही चमकला!

लखलखत्या किरणांनी झाडे लखाखली

तुमच्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली!

शुभ सकाळ

 

--------------------------

 

नवा दिवस नवी सुरूवात,

नवी प्रेरणा आणि तुमची साथ,

आयुष्य सुंदर अन् तुमचा हात हातात आहे,

परमेश्वराकडे मी यासाठी कृतज्ञ आहे!

 

--------------------------

 

चांगली माणसं आणि चांगले विचार सोबत असतील, 

तर जगात कुणीच तुमचा पराभव करू शकत नाही, 

शून्यालाही देता येते किंम फक्त, 

त्याच्या पुढे एक कोण ते महत्त्वाचे आहे!

शुभ सकाळ

 

--------------------------

 

आपली सकाळ भारी,

आपली दुपार भारी,

आपली संध्याकाळपण भारी

अरे….आपला तर पूर्ण दिवसच लय भारी! 

शुभ सकाळ

 

--------------------------

 

नजरेत भरणारी माणसं जगात भरपूर असतील,

पण ह्रदयात राहणारी माणसं क्वचितच भेटतात! 

शुभ सकाळ

विभाग