Good Morning Wishes : आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं! सकाळची सुरुवात करा खास
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं! सकाळची सुरुवात करा खास

Good Morning Wishes : आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं! सकाळची सुरुवात करा खास

Feb 01, 2025 07:49 AM IST

Good Morning Wishes In Marathi: अंथरुणातून उठण्यापूर्वी आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो.

Good Morning Wishes In Marathi
Good Morning Wishes In Marathi

Good Morning Marathi Message: कुणाला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणाऱ्या सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता देता येते. तुम्हालाही रोजचा दिवस इतरांसाठी खास बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे,

ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात,

आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं

पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.

 

 

ही सकाळ जेवढी सुंदर आहे,

तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो,

जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे

त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो…

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

 

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,

फुलांच्या हळुवार सुगंधानी

आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,

ही सकाळ आपल स्वागत करत आहे.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

 

जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल

तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता,

तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करा..

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

 

विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी

काही चांगले करत असतो,तेव्हा

आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही

चांगलं घडत असतं…

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

चालणारे दोन पाय किती विसंगत असतात

एक मागे असतो तर एक पुढे असतो,

पुढच्याला अभिमान नसतो मागच्याला अपमान नसतो

कारण त्यांना माहीत असतं की, क्षणात हे बदलणार आहे..

याचं नाव जीवन असतं…..

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

 

प्रॉब्लेम्स हे येतंच राहणार त्यांची सवय

करून त्यांना टक्कर देणे महत्वाचं आहे..

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

 

चांगली भूमिका चांगली ध्येय

आणि चांगले विचार,असणारे लोक

नेहमी आठवणीत राहतात…

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

 

 

कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास

ह्या असफलता नावाच्या बिमारीवरील

दोन औषधे आहेत,ज्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

Whats_app_banner