Good Morning Wishes: आपल्या आयुष्याला दररोज एक नवीन स्वप्न द्या! दिवसाची सुरुवात ‘या’ गुड मॉर्निंग मेसेजने करा!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: आपल्या आयुष्याला दररोज एक नवीन स्वप्न द्या! दिवसाची सुरुवात ‘या’ गुड मॉर्निंग मेसेजने करा!

Good Morning Wishes: आपल्या आयुष्याला दररोज एक नवीन स्वप्न द्या! दिवसाची सुरुवात ‘या’ गुड मॉर्निंग मेसेजने करा!

Published Jul 13, 2024 05:00 AM IST

Good Morning Wishes: आपला दिवस आनंदी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही निवडक गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत.

good morning wishes
good morning wishes (shutterstock)

Good Morning Wishes In Marathi: एक चांगला संदेश आपल्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करू शकतो. तुमचा आणि तुमच्या प्रियजनांचा दिवस आनंदी आणि सकारात्मक करण्यासाठी आम्ही असे गुड मॉर्निंग मेसेजेस घेऊन आलो आहोत, जे नक्की प्रेरणा देतील. गुड मॉर्निंगचे हे शायरी मेसेज तुम्ही फेसबुक स्टेटस किंवा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरही टाकू शकता. 

पाहा बेस्ट गुड मॉर्निंग मेसेज

 

आशेने भरलेल्या नव्या पहाटेचे स्वागत करा,

आपल्या आयुष्याला दररोज एक नवीन स्वप्न द्या,

आपल्या स्वप्नांना आणि आशांना रोज एक नवीन सुरुवात द्या!

गुड मॉर्निंग

 

जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करत असाल,

तर, संपूर्ण विश्व तुम्हाला ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते!

शुभ सकाळ

 

ज्यांचा हेतू चांगला असतो,

त्यांच्यासमोर सगळ्या अडचणी छोट्या असतात.

गुड मॉर्निंग

 

जर तुम्ही तुमच्या चुका वेळीच मान्य केल्या नाहीत

तर, तुम्ही आणखी एक चूक करता!  

तुम्ही तुमच्या चुकांमधून तेव्हाच शिकू शकता,

जेव्हा तुम्ही तुमच्या चुका स्वीकारू शकता.

शुभ सकाळ

आपण आपल्या अमर्याद विचारांना आळा घालून,

स्वत:ला पूर्णपणे बदलू शकता'.

गुड मॉर्निंग

 

स्वप्ने ती नाहीत, जी आपण झोपेत पाहतो,  

स्वप्ने ती आहेत, जी आपल्याला झोपूच देत नाहीत.

सुप्रभात

 

आपल्याकडे वेळ नाही असे, आपण म्हणू शकत नाही 

कारण महान आणि यशस्वी लोकांना देखील,

तेव्हढाच वेळ मिळतो, जेवढा वेळ तुम्हाला मिळतो!

शुभ सकाळ

 

जीवनातील अडचणी आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नाहीत, 

तर आपली लपलेली शक्ती बाहेर आणण्यास मदत करतात!

गुड मॉर्निंग

 

सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते,

तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते,

दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो, 

तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो!

शुभ सकाळ

 

मालमत्तेचे वारस खूप सारे असू शकतात, 

पण आपल्या कर्माचे वारस दुसरे कोणी नसून फक्त आपणच!

शुभ सकाळ

 

प्रेमाने जोडलेली चार माणसं आणि

त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द,

हे वैभव ज्याच्याजवळ आहे,

तोच या जगात खरा श्रीमंत आहे!

शुभ सकाळ

 

वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. 

सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे.

गुड मॉर्निंग

Whats_app_banner