Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.
जगात सगळं काही विकत घेता येतं,
पण कुणाचं मन आणि त्याची भावना
कुणीच विकत घेऊ शकत नाही.
लक्षात ठेवा, जर तुम्ही दोष लपवला,
तर तो मोठा होतो आणि
जर दोष कबूल केला तर तो नाहीसा होतो!
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तरी जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे
शुभ सकाळ
प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी
गुंफलेली कविता,
जाणिवेच्या पलीकडच
जगावेगळ गाव,
यालाच तर आहे “आयुष्य” हे नाव
तुमचा दिवस सुखाचा जावो.
जगातलं कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून
दुरावला जातो..
तसे असले तरीही नाती जपण्यातच
खरा आनंद आहे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
शुभ सकाळ!
एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!
शुभ सकाळ!
उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
शुभ सकाळ !
जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो.
तुमची किंमत तेव्हा होईल,
जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं.
बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली,
ते घरटं कधी विसरु नये.
शुभ सकाळ
संबंधित बातम्या