Good Morning Marathi Message: कुणाला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणाऱ्या सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता देता येते. तुम्हालाही रोजचा दिवस इतरांसाठी खास बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.
काळ कसोटीचा आहे....
पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे...
आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या...
कमळाकडून शिकावे ….
चिखलात राहून पण आपले
अस्तित्व टिकवावे लागते,
चांगले घडण्यासाठी वाईट
परिस्थितीतून जावेच लागते..!!
शुभ सकाळ
अपयश हे संध्याकाळी
विसरून जायचे असते, कारण
उजाडलेली सकाळ
आपल्याला यशापर्यंत
पोहचण्यासाठी नवीन संधी
उपलब्ध करून देत असते..
शुभ सकाळ…!
पानगळ झाल्याशिवाय
झाडाला नविन पालवी येत नाही.
त्याचप्रमाणे आयुष्यात
कठीण प्रसंगांचा सामना
केल्याशिवाय
चांगले दिवस येत नाही..
शुभ सकाळ
आज माझ्याच सावलीला विचारलं मी
का चालते तू माझ्यासोबत..?
सावलीने पण हसत उत्तर दिलं
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत..
शुभ सकाळ
आयुष्य नेहमीच एक संधी देते
सोप्या भाषेत त्याला आज म्हणतात.
शुभ सकाळ
स्वतःच्या आत्मविश्वासाची
ढाल मजबूत असेल तर
जगाने तुमच्या खच्चीकरणसाठी
कितीही उलाढाल करूद्या,
काहीही फरक पडणार नाही…!!
शुभ सकाळ
त्युत्तर न देण्याचा अर्थ
असा नव्हे की आपल्यापाशी
काही उत्तरच नाही.
पण कित्येकदा नाती
सांभाळण्यासाठी स्वतः मौन राहून
पराजय स्विकारणं केव्हाही
श्रेष्ठच असतं..!!
शुभ सकाळ
उगवता सूर्य आणि मावळता सुर्य
दोन्ही दिसायला सारखेच दिसतात,
पण दोघात फरक एवढाच आहे की,
उगवता सूर्य आशा घेऊन येतो
आणि मावळता सुर्य अनुभव देऊन जातो..
शुभ सकाळ
जीवन आहे एक कसोटी
मागे वळून पाहू नका.
येईल तारावया कोणी,
वाट कोणाची पाहू नका.
हे सार जग जिंकायचे आहे..
हार कधी मानु नका..
यश तुमच्या जवळ आहे,
जिंकल्या शिवाय थांबू नका.
सुख माणसाच्या अहंकाराची
परिक्षा घेते, तर
दुःख माणसाच्या धैर्याची…
दोन्ही परिक्षा मध्ये जो माणुस
उतीर्ण होतो, तोच माणुस
जीवनात यशस्वी होतो..
सुप्रभात
संबंधित बातम्या