Good Morning Wishes: प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात करा दमदार! पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात करा दमदार! पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज

Good Morning Wishes: प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात करा दमदार! पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज

Jul 16, 2024 05:00 AM IST

Good Morning Wishes In Marathi: शुभ सकाळ म्हणत शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी प्रेरणादायी आणि सुंदर संदेश शोधत असतात.

Good Morning Wishes In Marathi
Good Morning Wishes In Marathi

Good Morning Wishes In Marathi: जेव्हा कुणी प्रेमाने सुप्रभात म्हणतं, तेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळ म्हणत शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी प्रेरणादायी आणि सुंदर संदेश शोधत असतात. तुम्ही देखील आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना पाठवण्यासाठी गुड मॉर्निंग मेसेज शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला असे काही मेसेज देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.

 

हे सकाळ तू येशील तेव्हा

सगळ्यांना आनंद दे,

प्रत्येक चेहऱ्यावर हसू दे,

प्रत्येक अंगणात मंद सुगंध दरवळू दे!

तुम्हाला नव्या सकाळच्या गोड शुभेच्छा!

 

ज्या व्यक्तीची सकाळी

सर्वात आधी आठवण येते,

तीच व्यक्ती आयुष्यातील सर्वात खास असते!

सुप्रभात!

 

सूर्या, तू त्यांना माझा संदेश दे,

त्यांना आनंदाचा दिवस आणि हास्याची संध्याकाळ दे,

जेव्हा ते माझा हा मेसेज प्रेमाने वाचतात,

तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू दे!

तुमचा दिवस छान जावो!

 

देवाने विचारले काय हवे,

मी म्हणालो - यश, आनंद, दीर्घायुषी

मग आवाज आला, कोणासाठी?

मी म्हणालो, जो हा मेसेज वाचतोय त्याच्यासाठी!

सुप्रभात माझ्या मित्रा!

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार,

आपले वागणे आणि आपली कृती आपले नशीब लिहितात.

शुभ प्रभात!

 

आयुष्य सोपं नसतं, ते सोपं करावं लागतं…

कधी खास अंदाजाने, तर कधी नजर अंदाजाने...

गुड मॉर्निंग!!

 

प्रत्येक सकाळ हा एक नवीन आशीर्वाद असतो,

जीवन तुम्हाला दुसरी संधी देते

कारण तुम्ही ते पात्र आहात!

गुड मॉर्निंग

 

जिथे प्रेम व्यक्त करावे लागते, तिथे प्रत्यक्षात प्रेम नसते,

प्रेम ही फक्त एक भावना असते, जी अनुभवता येते!

शुभ प्रभात!

तुम्हाला फक्त आनंदच नाही तर शांतीही मिळेल!

गुड मॉर्निंग

 

आवश्यक तेवढेच नम्र व्हा,

कारण तुमच्या विनयशीलतेने इतरांचा अहंकार वाढतो.

गुड मॉर्निंग

 

छोट्या छोट्या गोष्टी हृदयात ठेवल्याने

मोठी नाती कमकुवत होतात,

मोठे हृदय आयुष्याची प्रत्येक सकाळ आनंदी करते.

शुभ प्रभात!

Whats_app_banner