Good Morning Marathi Message: एखाद्या व्यक्तीला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते. तुम्हालाही तुमचा दिवस इतरांसारखा बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.
दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.
तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील
एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
शुभ सकाळ
नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
आणि,नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..
शुभ सकाळ!
कधी भेटाल तिथे एक
स्माईल देऊन बोलायला विसरु नका..
कधी चूक झाल्यास माफ करा,
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..
स्वतःसाठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या,
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.
शुभ सकाळ
मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही…
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात.
शुभ सकाळ
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते.
शुभ सकाळ
माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने,
कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर
एखादे वेळेस साथ देणार नाही,
पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव
आणि आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही.
शुभ सकाळ
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी
राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
शुभ सकाळ
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
गुड मॉर्निंग
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..
मात्र, एक मिनिट विचार करून,
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
शुभ सकाळ!