Good Morning Wishes In Marathi : जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी प्रेमळ आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला ‘शुभ सकाळ’ म्हणणारे सर्वोत्तम संदेश मिळतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.
आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय,
पांढऱ्या धुक्यातून सूर्य वर आलाय,
माझ्या मनात आनंदाचा सुंगध दरवळलाय
कारण तुम्हाला भेटण्यासाठी आज पुन्हा नवा दिवस उगवलाय!
शुभ सकाळ
मोगरा दूर असला तरी,
त्याचा सुगंध कमी होत नाही,
तसंच आपण कर्तव्यासाठी कितीही दूर असलो,
तरी आपलं प्रेम कधीच कमी होणार नाही!
शुभ सकाळ
येणारी प्रत्येक सकाळ इतकी रम्य असावी,
तुझी चिंता काळजी सर्व काही दूर पळून जावी,
येणारा प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साहाचा असावा,
तुझ्या खूश असण्याचा सर्वांनाच हेवा वाटावा!
सुप्रभात
धुक्याने आज एक छान गोष्ट शिकवली…
रस्ता दिसत नसेल तर, फार दुरचं पाहण्यात फायदा नाही,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होईल!
आपली सकाळ भारी,
आपली दुपार भारी,
आपली संध्याकाळपण भारी,
अरे….आपला तर पुरा दिवसच लय भारी!
शुभ सकाळ
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला,
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही,
अशा सामर्थ्यशाली व्यक्तीला हरवण्याचे धाडस,
नियतीसुद्धा कधीच करत नाही!
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
शुभ सकाळ!
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात,
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत!
शुभ सकाळ
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
शुभ सकाळ
सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.
संबंधित बातम्या