Good Morning Wishes : नवीन दिवस नवीन उत्साह…या खास मेसेजचा उपयोग करा आणि प्रियजनांना गुड मॉर्नींग म्हणा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : नवीन दिवस नवीन उत्साह…या खास मेसेजचा उपयोग करा आणि प्रियजनांना गुड मॉर्नींग म्हणा

Good Morning Wishes : नवीन दिवस नवीन उत्साह…या खास मेसेजचा उपयोग करा आणि प्रियजनांना गुड मॉर्नींग म्हणा

Published Feb 14, 2025 08:02 AM IST

Good Morning Wishes In Marathi : गुड मॉर्निंग मेसेज पाठवण्यासोबतच हे उत्साह निर्माण करणारे सकारात्मक मेसेज तुमच्या प्रियजनांना देईल नवीन ऊर्जा. दिवस आनंदात व्यतीत व्हावा याकरीता सकाळी पाठवा हे खास शुभेच्छा संदेश.

गुड मॉर्निंग विशेज मेसेज
गुड मॉर्निंग विशेज मेसेज (shutterstock)

Good Morning Messages In Marathi : गुड मॉर्निंग म्हणणं हे सौजन्य आहे. नवीन दिवस उगवला की आपली नवीन उम्मेद जागी होते. सकाळी आपण देवाचे नामस्मरण करतो किंवा ताजी-तवानी करणारी गाणी ऐकतो आणि आपला दिवस खास बनवतो. सकाळी आपण मॉर्नींग वॉक ला जात असाल किंवा आपण एखाद्या व्यक्तीला सकाळी भेटल्यावर समोरासमोर शुभेच्छा देत असाल आणि त्यांचा दिवस खास होण्यासाठी त्यांना खास अंदाजात शुभ सकाळ म्हणत असालच, त्याचप्रमाणे मेसेजच्या माध्यमातूनही गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा दिल्या जाऊ शकतात. तुम्ही गुड मॉर्निंग म्हणूनही आपल्या प्रियजनांना काही सकारात्मक संदेश देऊ शकतात. 

नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. नवीन दिवसाची नवीन सुरवात तुमची एकदम तेजोमय आणि आनंदात जावो. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा देण्यासाठी, गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी या मेसेजचा वापर केला जाऊ शकतो.

गुड मॉर्नींग मेसेज -

जर तुम्हाला मनापासून काही हवं असेल 

तर संपूर्ण जग तुमच्यासोबत आहे.

एक नवीन दिवस, 

नवीन आशा आणि 

नवीन उत्साह आपली वाट पाहत आहे.

गुड मॉर्निंग…

आयुष्यात अडचणी तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर

तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतात.

आयुष्य एखाद्या पुस्तकासारखं आहे,

रोज एक नवं पान बदलतं.

कधी हसतो, कधी रडतो,

पण रोज काहीतरी शिका

सुप्रभात

आयुष्याचे ध्येय ठेवणे महत्वाचे आहे, कारण

यामुळे आपल्याला जीवनाचा अर्थ समजतो.

गुड मॉर्निंग

क्षण …. जगायचे असतात, 

अनुभवायचे असतात, 

जपायचे असतात

शुभ सकाळ

तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा

आणि त्यात तुमचे संपूर्ण आत्मसमर्पण लावा.

तुमचा आजचा दिवस गोड जाओ

शुभ सकाळ

समर्पण आणि कठोर परिश्रमाने 

आपण आपल्या स्वप्नांच्या गंतव्यस्थानाच्या जवळ पोहोचता.

गुड मॉर्निंग

देवाने आपल्याला डोळे दिले आहेत 

जेणेकरून आपण जीवनातले सौंदर्य पाहू शकू,

अडचणी नाही

सुप्रभात..

आयुष्य हे चित्रासारखे आहे, मनासारखे रंग भरले

की फुला सारखे खुलून दिसतात.

शुभ सकाळ

खरा विजय तोच आहे 

जो दुसऱ्याच्या पराभवावर नव्हे 

तर स्वतःच्या प्रयत्नांवर आधारित असावा.

गुड मॉर्निंग,

सकारात्मक विचार केल्याने सर्व काही सकारात्मक होते. 

ही सकाळ छान आहे!

शुभ प्रभात

दुसऱ्यांचा आनंद पाहून आनंदी होण,

हे अतिशय निरोगी मनाच लक्षण आहे

शुभ सकाळ

Priyanka Chetan Mali

TwittereMail

प्रियंका माळी ही हिंदुस्तान टाइम्स -मराठीमध्ये कन्टेन्ट रायटर असून ती राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषयांचा अभ्यास करून योग्य ती अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहचवत असते. प्रियंकाने बी कॉम आणि पत्रकारिता डिप्लोमा कोर्स केला असून ती ५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. एका स्थानिक मीडिया चॅनलमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून प्रियंकाने करिअरची सुरूवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स (डिजिटल) मध्ये भविष्य सेक्शनसाठी कन्टेन्ट रायटर म्हणून २ वर्ष काम केले आहे. प्रियंकाला फावल्या वेळेत वाचन करण्याची आणि कविता लिहिण्याची आवड आहे.

Whats_app_banner