Good Morning Wishes: जवळच्या लोकांना पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज; दिवसाची सुरुवात होईल उत्साहात!-good morning wishes in marathi send this special good morning message to your loved ones ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: जवळच्या लोकांना पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज; दिवसाची सुरुवात होईल उत्साहात!

Good Morning Wishes: जवळच्या लोकांना पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज; दिवसाची सुरुवात होईल उत्साहात!

Aug 24, 2024 07:23 AM IST

Good Morning Wishes In Marathi: जर, तुम्हाला तुमच्या प्रियजनांना सकाळी गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्याची सवय असेल, तर त्यांना साध्या मेसेजऐवजी छान मोटिव्हेशनल गुड मॉर्निंगचे संदेश पाठवू शकता.

Good Morning Wishes: जवळच्या लोकांना पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज
Good Morning Wishes: जवळच्या लोकांना पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज (Pixabay)

Good Morning Wishes In Marathi: नव्या दिवसासोबत आपण प्रत्येक गोष्टीची नव्याने सुरुवात करत असतो. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केल्याने आपल्याला प्रेरणा मिळू शकते आणि यामुळे आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यासाठी आपण मनाने तयार खंबीर होऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना सकाळी गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्याची सवय असेल, तर त्यांना साध्या मेसेजऐवजी छान मोटिव्हेशनल गुड मॉर्निंगचे संदेश पाठवू शकता. वाचा बेस्ट गुड मॉर्निंग संदेश…

परिस्थितीवर तुमची मजबूत पकड असेल,

तर, विष बाधकसुद्धा तुमचं नुकसान करू शकत नाहीत.

शुभ सकाळ

 

-----------------------------------

 

कठीण वाटांना घाबरू नका!

अवघड मार्ग अनेकदा

सुंदर ठिकाणी घेऊन जातात.

गुड मॉर्निंग

 

-----------------------------------

 

लहानपासुनच सवय आहे

जे आवडेल ते जपुन ठेवायचं..

मग ती वस्तु असो वा….

तुमच्यासारखी गोडं माणसं.

सुप्रभात!

 

-----------------------------------

 

आयुष्य खूप सुंदर आहे,

उतुंग भरारी मारा,

ढगा आढ उडणाऱ्या गरूडाला

पण तुमचा हेवा वाटला पाहिजे

इतके मोठे व्हा, आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत!

शुभ सकाळ!

 

-----------------------------------

 

काही आठवणी विसरता येत नाहीत,

काही नाती तोडता येत नाहीत.,

माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत,

चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत,

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत,

पावल अडखलली तरी चालणं नाही थांबत,

अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आटत,

बोलण नाही झालं तरी आठवण नाही थांबत!

शुभ सकाळ

 

-----------------------------------

 

बुद्धीचा वापर करण्याऱ्यापेक्षा,

मनाचा वापर करणारे जास्त चांगले असतात,

कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात,

पण मनाचा वापर करणारे

सर्वात आधी दुसर्‍यांचा विचार करतात!

शुभ सकाळ

 

-----------------------------------

 

आयुष्यातल्या असंख्य प्रॉब्लेमची,

फक्त दोनच कारणं असतात..

एकतर आपण विचार न करता

कृती करतो,

किंवा कृती करण्याऐवजी,

फक्त विचारच करत बसतो.

गुड मॉर्निंग

 

-----------------------------------

 

पुण्य दिसत नाही,पण वेळ आली की बरोबर उपभोगता येतं,

कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं,

तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं!

 

-----------------------------------

 

पूर्णविराम म्हणजे शेवट नाही,

कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो,

त्याच प्रमाणे जीवनात अपयश आले तर,

तो खरा शेवट नसतो तर ती नव्या यशाची सुरुवात असते!

शुभ सकाळ

विभाग