Best Good Morning Wishes Messages: अनेक लोकांना रोज सकाळी आपल्या जवळच्या लोकांना गुड मॉर्निंग मॅसेज पाठवण्याचा छंद असतो. सकाळी पाठवलेला एक मेसेज तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो आणि त्यांच्या दिवसाची स्रुरुवात आनंदाने करून देऊ शकतो. तुम्ही सुद्धा गुड मॉर्निंग शुभेच्छा देण्यासाठी चांगला संदेश शोधत आहात का? तर या शायरी पाहिल्यानंतर तुमचा शोध संपेल. हे प्रियजन आणि मित्रांना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
जगा इतकं की आयुष्य कमी पडेल,
हसा इतकं की आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की,
परमेश्वराला देणं भागच पडेल.
शुभ सकाळ
माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
शुभ सकाळ!
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
शुभ सकाळ!
चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही.
शुभ सकाळ!
आपला आत्मविश्वास हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तरी जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे
शुभ सकाळ!
जगातलं कटु सत्य हे आहे की,
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून
दुरावला जातो..
तसे असले तरीही नाती जपण्यातच
खरा आनंद आहे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने
प्रत्येकालाच वेगळं बनवलंय, प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलंय.
पाण्यापेक्षा तहान किती आहे, याला जास्त किंमत असते.
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सर्वच जोडतात.
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
स्वभाव अशी गोष्ट आहे, जी व्यक्तीला सर्वांचा प्रिय बनवते,
कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते,
म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.
शुभ सकाळ
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
शुभ सकाळ.
संबंधित बातम्या