मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: मैत्री असते ती वर्तुळासारखी! तुमच्या लाडक्या मित्रमैत्रिणींना पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज

Good Morning Wishes: मैत्री असते ती वर्तुळासारखी! तुमच्या लाडक्या मित्रमैत्रिणींना पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज

Jul 08, 2024 05:00 AM IST

Good Morning Wishes in Marathi: आपले मित्रमैत्रिणी हे नेहमीच आपल्यासाठी खूप खास असतात. काही तर इतके जिवलग असतात, की दिवसाची सुरुवात त्यांच्या मेसेजने होते.

Good Morning Wishes in Marathi
Good Morning Wishes in Marathi

Good Morning Wishes in Marathi: असं म्हणतात की, मैत्रीचं नातं हे या जगातील सगळ्यात सुंदर नातं आहे. आपल्याला जन्मतःच काही नाती जोडावी लगतात. आई, बाबा, बहीण, भाऊ, काका, मामा, मावशी, आत्या ही सगळीच नाती आपल्याला न मागता मिळालेली असतात. अर्थात ही नाती निवडण्याचा अधिकारही आपल्याकडे नसतो. मात्र, मैत्री हे असं नातं आहे, जे निवडण्याची संधी आपल्याला मिळालेली असते. आपले मित्रमैत्रिणी हे नेहमीच आपल्यासाठी खूप खास असतात. काही तर इतके जिवलग असतात, की दिवसाची सुरुवात त्यांच्या मेसेजने होते. त्यांचा मेसेज हाच तुमच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन येतो. तुम्ही देखील आपल्या मित्रमैत्रिणींना असेच मेसेज पाठवत असाल, तर ‘या’ खास चारोळ्या तुमच्यासाठी...

लग्नाआधी कुंडली का बघितली जाते? किती गुण आणि कसे मोजले जातात? जाणून घ्या

‘अशी’ खास अंदाजात करा लाडक्या मित्रमैत्रिणींच्या दिवसाची सुरुवात!

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून, ते अंतःकरणाची संपत्ती आहे,

ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.

ट्रेंडिंग न्यूज

दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्यांचं पोट कधी भरत नाही,

आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही!

।। शुभ सकाळ ।।

 

ओसाड माळरानावर जेव्हा गुलमोहर फुलतो,

तेव्हा त्याला बघून कळत की,

बहरण्यासाठी परिस्थिती नाही मनस्थिती भक्कम असावी लागते.

शुभ सकाळ

 

जन्म हा एका थेंबासारखा असतो,

आयुष्य एका ओळीसारखं असतं,

पण, मैत्री असते ती वर्तुळासारखी,

ज्याला कधीच शेवट नसतो!

शुभ सकाळ!

काहींच्या डोळ्यात खुपण्यात सुद्धा वेगळीच मजा असते..!!

सुप्रभात

 

सुंदरता नसली तरी चालेल!

सोज्वळता असली पाहीजे!!

सुगंध नसला तरी चालेल!

दरवळ असायला पाहिजे!!

नातं नसलं तरी चालेल!

आपुलकीचे बंधन असायला पाहिजे!!

भेट होत नसली तरी चालेल!

स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे!!

शुभ सकाळ

 

आयुष्यात कुणाची पारख करताना त्याच्या रंगावरून न करता उलट त्याच्या मनावरून करा.

कारण पांढऱ्या रंगावर जर जगाचा विश्वास असता, तर मीठानेसुद्धा जखमा भरल्या असत्या!

गुड मॉर्निंग

 

इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य आहे.

दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात.

फरक एवढाच की,

इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने आणि माणसांचे रंग अनुभवाने पाहता येतात.

शुभ सकाळ

WhatsApp channel