Good Morning Wishes In Marathi: आठवड्यातील कोणताही दिवस असो, जर त्या दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस खास बनतो. आणि त्यातही जर हा खास मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखीच विशेष असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमुळे आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. झोपेतून उठल्याबरोबर आपण अपेक्षेने आपल्या फोनकडे पाहतो आणि तेव्हा आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर मधाळ हसू आणू शकतो.
सूर्योदयाचा किरण तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटवो,
आनंदी आणि सकारात्मक विचारांनी तुमचा दिवस सजवो,
सुप्रभात म्हणून, नव्या आशेने जागा होवो,
तुमच्या यशाच्या गाथा सर्वांना प्रेरणा देवो.
शुभ सकाळ
----------------------------------
या सकाळी, सूर्योदयाचे तेज तुमच्या जीवनात नव्या दिशा आणो,
स्वप्न पूर्ण करण्याची, आणि नव्याने सुरुवात करण्याची ऊर्जा देवो.
शुभ सकाळ
----------------------------------
आजची सकाळ नवीन उमेदींनी भरलेली असो,
तुमचे प्रत्येक क्षण सुखाचे आणि समाधानाचे असो.
शुभ प्रभात
----------------------------------
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते,
कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व नाही.
शुभ सकाळ!
----------------------------------
काळ कसोटीचा आहे,
पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे!
शुभ सकाळ
----------------------------------
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही!
शुभ सकाळ
----------------------------------
धुक्याकडून एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते,
जीवनात रस्ता दिसत नसेल, तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं!
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल!
शुभ सकाळ
----------------------------------
सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..
पण सत्य कधीच हरत नाही!
शुभ सकाळ
----------------------------------
मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हांच होतो,
जेव्हा ते उघडले जातात..
नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते!
शुभ सकाळ
----------------------------------
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते,
उन्हात फिरताना सावलीची गरज असते,
जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते.
माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ!
----------------------------------
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही!
अशा सामर्थ्यशाली व्यक्तीला हरवण्याचे धाडस
नियतीसुद्धा कधीच करत नाही!
शुभ सकाळ