Good Morning Wishes In Marathi: दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनीच करावी. कारण असे काही विचार असतात जे एखाद्याच्या आयुष्याला नवी दिशा देतात. त्यामुळे जेव्हा आपण हे विचार आपल्या प्रिय व्यक्ती किंवा मित्र आणि सहकाऱ्यांसोबत शेअर करतो, तेव्हा त्यांच्या जीवनातही सकारात्मक बदल घडतील अशी आशा करतो. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात सुंदर करण्यासाठी चांगल्या आणि अद्भुत कल्पना शोधत असाल, तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही सुंदर संदेश आहेत. हे संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाला पाठवून त्यांचा दिवस गोड बनवू शकता...
रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्यही चमकला,
लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली
तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली!
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
शुभ सकाळ!
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
सुप्रभात
कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने
प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं.
पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते.
मृत्यू पेक्षा “श्वासाला”जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सर्वच जोडतात.
पण नात्यापेक्षा” विश्वासाला ” जास्त किंमत असते.
शुभ सकाळ
स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.
शुभ सकाळ
दिवा कधीच बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका
चांगले कर्म करत रहा
तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील.
शुभ सकाळ
मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध
हा येणारच, आणि आपली
माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच…
आपुलकी असेल तर जीवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर
शुभ सकाळ
संबंधित बातम्या