Good Morning Wishes : पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला... प्रियजनांना पाठवा 'हे' गुड मॉर्निंग मेसेज!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला... प्रियजनांना पाठवा 'हे' गुड मॉर्निंग मेसेज!

Good Morning Wishes : पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला... प्रियजनांना पाठवा 'हे' गुड मॉर्निंग मेसेज!

Updated Feb 12, 2025 08:00 AM IST

Good Morning Messages In Marathi: सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो.

पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला... प्रियजनांना पाठवा 'हे' गुड मॉर्निंग मेसेज!
पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला... प्रियजनांना पाठवा 'हे' गुड मॉर्निंग मेसेज! (Shutterstock)

Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.

पहाटेचा मंद वारा

खूप काही सांगून गेला

तुझी आठवण येत आहे

असा निरोप देऊन गेला

 

 

रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर

सुख-दुःखाची नाणी फेकत असतो,

ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात,

तो सुखाचा व्यापार करतो.

पण दुःखाची नाणी हाती पडूनही

जो सुखाचा व्यापार करतो,

त्यालाच जीवन जगणे म्हणतात..!

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

 

तुम्ही कोणासाठी कितीही केले,

तरी ते कोठेतरी कमीच पडते.

कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत,

खोटं गावभर हिंडून आलेलं असतं.

शुभ सकाळ

 

 

श्रद्धा ज्ञान देते,

नम्रता मान देते,

आणि

योग्यता स्थान देते,

पण तिन्ही मिळाले तर,

त्या व्यक्तीला दुनिया सन्मान देते!

शुभ सकाळ

 

जीवनात ज्या व्यक्तीने आपल्याला

पुढे जाण्याची चाल दिली

त्याला कधीही कमी लेखू नका,

तुमच्या पेक्षा जास्त कुवत असूनही

तो फक्त तुमच्यासाठी मागे थांबलेला असतो

याची जाणीव ठेवा….!

शुभ सकाळ

 

 

फुलामध्ये किडा सापडतो,

दगडामध्ये हीरा सापडतो...

वाईटाला सोडा चांगल्याकडे बघा..

माणसामध्ये ही देव सापडतो..

मी आपला मित्र आहे हे माझं भाग्य आहे..

पण तुम्ही सगळे माझे मित्र झालात

हे माझं परम भाग्य आहे..

जो रुसतो त्याला हसवा..

जो हरवतो त्याला मिळवा..

शुभ सकाळ

 

रांगोळी ही पुसली जाणार आहे

हे माहीत असून देखील

आपण ती अतिशय सुबक आणि

रेखीव व सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो,

तसंच आपलं आयुष्य हे

कधीतरी संपणार आहे

ते अधिक सुंदर आणि

सुंदर जगण्याचा प्रयत्न करा!

 

 

आई वडीलांचा हात पकडून ठेवा ...

लोकांचे पाय पकडण्याची गरज नाही पडणार...

ज्यांनी आपल्याला आपल्या लहानपणी राजकुमारासारख संभाळलं ,

त्यांना त्यांच्या म्हातारपणी, राजा सारखं संभाळा.

लक्षात ठेवा,

ना मंदिर, ना मशीद, ना चर्च , ना गुरुद्वरा, ना गंगेच पाणी.

ते घरच मंदिर आहे ज्या घरात आई वडिलांचा सत्कार आणि सन्मान होतो!

तोच माझा भगवान आहे.

शुभ सकाळ

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner