Good Morning Wishes In Marathi: दररोजची सकाळ एक नवीन सुरुवात, आठवणी बनवण्याची नवी संधी आणि ज्यांची आपण काळजी घेतो त्यांना आनंद पसरवण्याची संधी घेऊन येते. दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली, तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असं म्हटलं जातं. अर्थात जर कोणी तुम्हाला सकाळी मेसेज करत असेल, तर तो अगदी निवडकपणे पाठवलेला असतो. अशावेळी तुम्हीही काही निवडक मेसेजच्या माध्यमातून त्यांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छाही देऊ शकता.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
शुभ सकाळ !
----------
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
!! शुभ सकाळ !!
----------
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
सुप्रभात!
----------
‘माझ्यामुळे तुम्ही नाही’ तर ‘तुमच्यामुळे मी आहे’ ही वृत्ती ठेवा,
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं,
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.
शुभ सकाळ!
----------
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
शुभ सकाळ!
----------
सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…
शुभ सकाळ
----------
आपुलकी असेल तर जीवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर!
शुभ सकाळ!
----------
सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण, स्वप्न पूर्ण झालं नाही तर दुखी व्हायचं नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं,
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपलं नसतं.
शुभ सकाळ!
----------
नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्या शिवाय आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही!
शुभ सकाळ