Good Morning Wishes In Marathi: गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी फक्त दोन शब्द पुरेसे नसतात, विशेषत: जेव्हा आपल्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचा प्रवेश झाला असेल. प्रत्येक सकाळ खास असते. ही खास सकाळ आणखी खास बनवायची असेल तर या शायरी तुमच्या पार्टनरला पाठवा, मग पाहा जोडीदार तुमच्यावर दिवसभर कसा प्रेमाचा वर्षाव करेल. ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज तुमच्यासाठीच….
चहाच्या कपातून उठणाऱ्या धुरात
मला तुझा चेहरा दिसतो,
मी तुझ्या विचारांमध्ये इतका हरवून जातो,
की अनेकदा चहा थंड होतो.
--------------------------------------------
आकाशापेक्षा कोणीही उंच नाही.
समुद्रापेक्षा खोल कोणीही नाही.
प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करतो,
पण तुझ्यापेक्षा प्रिय कोणी नाही.
शुभ प्रभात!
--------------------------------------------
मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे…
शुभ सकाळ
--------------------------------------------
खरे प्रेम हे तुरुंगातील कैद्यासारखे असते,
वय गेले तरी पूर्ण होत नाही!
गुड मॉर्निंग
--------------------------------------------
दवाचे थेंब फुलांना भिजवत आहेत,
थंड वारे ताजेपणा जागृत करत आहेत,
ये आणि या अनुभवात सामील हो,
एक सुंदर सकाळ तुझं स्वागत करत आहे!
--------------------------------------------
आयुष्यात मिळणारी सकाळ
तुम्हाला आयुष्य जगण्याची नवी संधी देते.
शुभ प्रभात!
--------------------------------------------
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
शुभ सकाळ
--------------------------------------------
आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा,
धन-दौलत कोण कोणाला देत नसतं,
फक्त माणुसकी जपत रहा.
प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा
तुम्ही आम्हाला हाक द्या!
गुड मॉर्निंग
--------------------------------------------
जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.
सुप्रभात
--------------------------------------------
मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध हा येणारच,
आणि आपली माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच…
शुभ सकाळ
--------------------------------------------
आपुलकी असेल तर जीवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर
शुभ सकाळ