Good Morning Wishes In Marathi: प्रत्येक दिवस ही आयुष्याला मिळालेली एक नवी संधी असतो आणि प्रत्येक नव्या दिवसाची सुरुवातही नवी असते. त्यामुळे तुम्ही सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात केली, तर तुमचा संपूर्ण दिवस सकारात्मक, आनंददायी आणि उत्साही जाऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर व्यायाम, वाचन आणि नाश्ता करणं जेवढं गरजेचं असतं, तेवढंच सकारात्मक विचार करणं देखील आपल्यासाठी गरजेचं असतं. दिवसाची सुरुवात सकारात्मक केली, तर तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना देखील तुमच्याकडून उर्जा आणि प्रेरणा देखील मिळू शकते. चला तर, आपल्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात छान प्रेरणादायी मेसेजेसनी करूया...
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते.
जेव्हा तुम्ही जिंकू लागता,
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात!
शुभ सकाळ
------------------------
स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे.
आणि अतिशय महत्वाचे म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तींनाही वेळ द्या,
कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही!
शुभ सकाळ
------------------------
आयुष्य खूप सुंदर आहे,
उतुंग भरारी घ्या,
ढगा आढ उडणाऱ्या गरूडाला
पण तुमचा हेवा वाटला पाहिजे
इतके मोठे व्हा!
शुभ सकाळ
------------------------
मंदिरातील घंटेला आवाज नाही, जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही
कवितेला चाल नाही, जोपर्यंत तुम्ही ती गात नाही
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत
शुभ सकाळ
नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय
यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश नव्हे तो यशाचाच एक भाग आहे.
शुभ सकाळ
------------------------
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलोपावली येतील कठीण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
शुभ प्रभात
------------------------
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी राहा!
शुभ सकाळ
------------------------
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका,
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात!
शुभ सकाळ