Good Morning Wishes: लहान असो वा मोठा, आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला पाठवा ‘हे’ प्रेरणादायी गुड मॉर्निंग मेसेज-good morning wishes in marathi send these inspirational good morning messages to everyone close to you ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: लहान असो वा मोठा, आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला पाठवा ‘हे’ प्रेरणादायी गुड मॉर्निंग मेसेज

Good Morning Wishes: लहान असो वा मोठा, आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला पाठवा ‘हे’ प्रेरणादायी गुड मॉर्निंग मेसेज

Aug 30, 2024 07:35 AM IST

Good Morning Wishes In Marathi: गुड मॉर्निंग मेसेजसोबतच काही पॉझिटिव्ह विचारही पाठवणे गरजेचे आहे. यामुळे दिवस आनंदात आणि उत्साहात व्यतीत होईल.

Good Morning Wishes: लहान असो वा मोठा, आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला पाठवा ‘हे’ प्रेरणादायी गुड मॉर्निंग मेसेज
Good Morning Wishes: लहान असो वा मोठा, आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला पाठवा ‘हे’ प्रेरणादायी गुड मॉर्निंग मेसेज (shutterstock)

Good Morning Wishes In Marathi: गुड मॉर्निंग म्हणणं हे सौजन्य आहे. जसे आपण एखाद्या व्यक्तीला सकाळी आठवल्यावर त्याला समोरासमोर भेटण्याची इच्छा व्यक्त करता. त्याचप्रमाणे मेसेजच्या माध्यमातूनही गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा दिल्या जाऊ शकतात. पण, कधी कधी तुम्हाला गुड मॉर्निंगने आपल्या छोट्या किंवा मोठ्या असणाऱ्या जवळच्या व्यक्तीला काही सकारात्मक संदेश द्यायचे असतात. त्यामुळे गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी या मेसेजचा वापर केला जाऊ शकतो.

जर तुम्हाला मनापासून ते हवं असेल, 

तर संपूर्ण जग तुमच्यासोबत आहे.

-------------------------------------------

एक नवीन दिवस, नवीन आशा आणि 

नवीन पहाट आपली वाट पाहत आहे.

शुभ सकाळ

-------------------------------------------

आयुष्यात अडचणी तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर

तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतात.

गुड मॉर्निंग

-------------------------------------------

आयुष्य एखाद्या पुस्तकासारखं आहे,

रोज एक नवं पान बदलतं.

आपण कधी हसतो, कधी रडतो,

पण रोज काहीतरी नवीन शिकतो.

शुभ सकाळ

-------------------------------------------

आयुष्याचे ध्येय ठेवणे महत्वाचे आहे, कारण

यामुळे आपल्याला जीवनाचा अर्थ समजतो. 

गुड मॉर्निंग

-------------------------------------------

तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा,

आणि त्यात तुमचे संपूर्ण मन आणि आत्मा लावा.

गुड मॉर्निंग

-------------------------------------------

जेव्हा तुम्हाला आनंदी व्हायचे असेल, 

तेव्हा मनापासून आनंदी व्हा!

कुणासाठीही थांबू नका. 

गुड मॉर्निंग

-------------------------------------------

समर्पण आणि कठोर परिश्रमाने आपण आपल्या 

स्वप्नांच्या गंतव्यस्थानाच्या जवळ पोहोचता.

गुड मॉर्निंग

-------------------------------------------

देवाने आपल्याला डोळे दिले आहेत, 

जेणेकरून आपण सौंदर्य पाहू शकू,

अडचणी नाही

गुड मॉर्निंग

-------------------------------------------

.

खरा विजय तोच आहे जो दुसऱ्याच्या पराभवावर नव्हे,

तर स्वतःच्या प्रयत्नांवर आधारित असावा. गुड मॉर्निंग

-------------------------------------------

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,

एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला

तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,

कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,

कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे,

एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,

म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.

-------------------------------------------

आपुलकी असेल तर जीवन सुंदर

फुले असतील तर बाग सुंदर

गालातल्या गालात एक छोटस हसु असेल

तर चेहरा सुंदर आणि

नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर

शुभ सकाळ

-------------------------------------------

पूर्णविराम म्हणजे शेवट नाही,

कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो,

त्याच प्रमाणे जीवनात अपयश आले,

तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची सुरुवात असते!

गुड मॉर्निंग

विभाग