Good Morning Wishes : नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही! पाठवा 'हे' प्रेरणादायी गुड मॉर्निंग मेसेज
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही! पाठवा 'हे' प्रेरणादायी गुड मॉर्निंग मेसेज

Good Morning Wishes : नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही! पाठवा 'हे' प्रेरणादायी गुड मॉर्निंग मेसेज

Published Feb 17, 2025 07:57 AM IST

Good Morning Messages In Marathi: सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो.

Good Morning Wishes In Marathi
Good Morning Wishes In Marathi

Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,

एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला

तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही

कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी

कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे

एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,

म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.

सुप्रभात!

 

 

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…

आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात

गणपती दर्शनाने करूया…

 

 

धावपळीच्या या जीवनात कोण

कोणाची आठवण काढत नाही

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.

!! शुभ सकाळ !!

 

 

आयुष्य खूप लहान आहे

प्रेमाने गोड बोलत रहा

धन-दौलत कोण कोणाला देत नसत

फक्त माणुसकी जपत रहा

प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा

तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन.

शुभ सकाळ

 

 

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,

काहीतरी देण्यात महत्व असतं…

कारण मागितलेला स्वार्थ,

अन दिलेलं प्रेम असतं…

शुभ सकाळ!

 

 

पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,

त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,

सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…

शुभ सकाळ

 

 

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा

बाजार मांडू नका,

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..

शुभ सकाळ!

 

 

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,

नाजूक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.

शुभ सकाळ

 

 

आपलं जगणं दुसऱ्यासाठी

जेवणातल्या मिठासारखं असावं..

पाहिलं तर दिसत नाही,

पण नसलं तर जेवणच जात नाही.

शुभ सकाळ!

 

 

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे

जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड

कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.

शुभ सकाळ

 

 

स्वतः साठी वेळ द्या, कारण

आपण आहोत तर जग आहे..

आणि अतिशय महत्वाचे,

दुसऱ्यासाठी वेळ द्या

कारण ते नसतील तर

आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.

शुभ सकाळ

 

 

नाही कुणाचे फेकलेले मिळू दे,

नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे,

मला फक्त माझ्या नशीबात लिहिलेले मिळू दे,

हे सुध्दा नाही मिळालं तरी काही दुःखं नाही,

मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे.

शुभ सकाळ

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner