Good Morning Wishes In Marathi: सकाळी पाठवलेला एक सुंदर मेसेज तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर गोंडस स्मित हास्य घेऊन येतो आणि त्यांचा दिवस आनंदी करतो. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली करा आणि आपला संपूर्ण दिवस आनंदात घालवा, याच इच्छेने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग शायरी संदेश घेऊन आलो आहोत. हे गुड मॉर्निंग शायरी संदेश केवळ आपलाच नव्हे, तर आपल्या प्रियजनांनाचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात. आयुष्यात यश मिळवण्यासाठी माणसाने नेहमी चांगल्या संगतीत आणि विचारांमध्ये असायला हवे. चला तर मग, या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेसने एका सुंदर दिवसाची सुरुवात करूया.
तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
शुभ सकाळ!
डोळ्यांतून वाहणारं पाणी,
कोणीतरी पाहणारं असावं,
हृदयातून येणार दु:ख,
कोणीतरी जाणणारं असावं!
शुभ सकाळ!
उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
शुभ सकाळ!
जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणूस जोडतो…
शुभ सकाळ!
नाते सांभाळायचे असेल तर,
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
आणि नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी!
शुभ सकाळ!
यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही!
सुप्रभात!
मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही.
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात.
शुभ सकाळ!
आयुष्य कितीही कडू असलं तरी,
माझी माणसं मात्र खूप गोड आहेत,
अगदी तुमच्यासारखी!
मदत ही खूप महाग गोष्ट आहे,
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका,
कारण खूप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात!
सुप्रभात!
गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच..
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच..
शुभ सकाळ!
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते!
शुभ सकाळ
संबंधित बातम्या