Good Morning Wishes : संवाद हाच सगळ्या समास्यांवरचा उत्तम उपाय! सुंदर सकाळी पाठवा सकारात्मक मेसेज
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : संवाद हाच सगळ्या समास्यांवरचा उत्तम उपाय! सुंदर सकाळी पाठवा सकारात्मक मेसेज

Good Morning Wishes : संवाद हाच सगळ्या समास्यांवरचा उत्तम उपाय! सुंदर सकाळी पाठवा सकारात्मक मेसेज

Oct 19, 2024 07:28 AM IST

Good Morning Wishes In Marathi:गुड मॉर्निंग शायरी संदेश केवळ आपलाच नव्हे, तर आपल्या प्रियजनांनाचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात. चला तर या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेसने एका सुंदर दिवसाची सुरुवात करूया...

Good Morning Wishes In Marathi:
Good Morning Wishes In Marathi: (pexel)

Good Morning Wishes In Marathi: सकाळी पाठवलेला एक सुंदर मेसेज तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर गोंडस स्मित हास्य घेऊन येतो आणि त्यांचा दिवस आनंदी करतो. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली करा आणि आपला संपूर्ण दिवस आनंदात घालवा, याच इच्छेने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग शायरी संदेश घेऊन आलो आहोत. हे गुड मॉर्निंग शायरी संदेश केवळ आपलाच नव्हे, तर आपल्या प्रियजनांनाचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात. चला तर मग, या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेसने एका सुंदर दिवसाची सुरुवात करूया...

 

अनेकदा राग आला की,

आपण लगेच अबोला धरतो.

पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन,

परिस्थिती अधिक चिघळत जाते.

शेवटी संवाद हाच सगळ्या समास्यांवरचा

उत्तम उपाय आहे!

म्हणून संवादाचे दरवाजे बंद करू नका!

 

 

तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते, 

जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल,

तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.

शुभ सकाळ

 

 

जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे, 

ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे,

ती कधीच गमावू नका,

नेहमी आनंदी रहा, हसत रहा, हसवत रहा.

शुभ सकाळ

 

 

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,

शर्यत अजून संपलेली नाही,

कारण मी अजून जिंकलेलो नाही.

शुभ सकाळ

 

 

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही...

मात्र, एक मिनिट विचार करून,

घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.

शुभ सकाळ!

 

ठाम राहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही.

स्वतःवर विश्वास असला की,

जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

 

 

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो

पण मनातून हरलेला माणूस

कधीच जिंकू शकत नाही.

शुभ सकाळ!

 

 

खेळ असो वा आयुष्य,

आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा, 

जेव्हा समोरचा आपल्याला 

कमजोर समजत असेल.

 

 

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि

चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..

मनात, शब्दात आणि आयुष्यातही!

शुभ सकाळ!

 

 

संकटावर अशा प्रकारे

तुटून पडा की,

जिंकलो तरी इतिहास,

आणि,

हरलो तरी इतिहासच..

शुभ सकाळ!

 

 

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,

त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..

एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,

तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते !

शुभ सकाळ!

 

Whats_app_banner