Good Morning Wishes : फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध... पार्टनरला खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध... पार्टनरला खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!

Good Morning Wishes : फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध... पार्टनरला खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!

Published Feb 11, 2025 07:53 AM IST

Good Morning Messages In Marathi : सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो.

फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध... पार्टनरला खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध... पार्टनरला खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग! (pixabay)

Good Morning Wishes In Marathi : जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मोर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.

दुःखाचे डोंगर कोसळले तरी

आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले

सुखाचे पडणारे हळुवार चांदणे

आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध

आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले

आपल्यासारखी गोड माणसे भेटली

आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले

 

 

कठीण काळात

सतत स्वतःला सांगा,

शर्यत अजून संपलेली नाही

कारण मी अजून जिंकलेलो नाही.

शुभ सकाळ

 

 

आवडतं मला लोकांना

नेहमी गुड मॉर्निंग म्हणायला

दूर असूनही मनाच्या कोपऱ्यात

एकत्र साठवून ठेवायला

शुभ सकाळ

 

 

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात

नाजूक उन्हाची प्रेमळ साथ

मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल

अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ

शुभ सकाळ

 

 

एकच आस, एक विसावा

तुझा मेसेज रोज दिसावा

परमेश्वराकडे हिच प्रार्थना

तुझा सहवास कायम मिळावा.

शुभ सकाळ

 

 

पहाटेचा मंद वारा

खूप काही सांगून गेला

तुझी आठवण येत आहे

असा निरोप देऊन गेला

शुभ सकाळ

 

 

आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय

पांढर्‍या धुक्यातून सूर्य वर आलाय

मा‍झ्या मनात आनंदाचं सुंगध दरवळलाय

कारण तुला भेटण्यासाठी आज पुन्हा नवा दिवस उगवलाय

शुभ सकाळ

 

एकच आस, एक विसावा

तुझा मेसेज रोज दिसावा

परमेश्वराकडे हिच प्रार्थना

तुझा सहवास कायम मिळावा

शुभ सकाळ

 

 

पहाटेच्या गारव्यात तुला मी आठवले

मैत्रींच्या गारव्यात पुन्हा पुन्हा साठवले

तुला भेटून बरेच दिवस झाले

आता तरी बास झाले तुझे बहाणे

शुभ सकाळ

 

 

मैत्रीचा मोती प्रत्येकाच्या भाग्यात नसतो

कारण समुद्रातही प्रत्येक शिंपल्यात तो नसतो

जो नाती जपतो त्यांनाच तो सापडतो

कारण खऱ्या मोत्यावर त्याचाच अधिकार असतो

 

 

दररोज मला तुला झोपेतून

हळूवार उठवायचं आहे

तू फक्त हो म्हण तुझी प्रत्येक सकाळ

मला खास करायची आहे!

शुभ सकाळ

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner