Good Morning Wishes In Marathi: वार कुठलाही असो, दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वी आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर 'हे' मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.
हसून पहावं, रडून पहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं
माणसावर करावं, माणुसकीवर करावं
प्रेम करावं तर मनापासून करावं...
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
देवाने विचारले काय हवे आहे,
मी म्हणालो, यश, आनंद, दीर्घायुष्य,
मग आवाज आला, कोणासाठी?
मी म्हणालो, जो हा मेसेज वाचतोय त्याच्यासाठी!
शुभ प्रभात!
ज्या व्यक्तीची सकाळी सर्वात
आधी आठवण येते
ती व्यक्ती आयुष्यातील सर्वात
खास व्यक्ती असते!
गुड मॉर्निंग प्रिये !
तुझ्यासोबत प्रत्येक दिवस प्रेममय वाटतो,
एका क्षणाचा वियोग एखाद्या समस्येसारखा वाटतो,
आधी विचार केला नव्हता,
पण आता विचार करू लागलो,
आयुष्याच्या प्रत्येक क्षण तुझ्याशिवाय निरुपयोगी वाटतो.
शुभ प्रभात!
हजार वेळा तुला पहावे,
असेच काही तुझ्यात आहे,
मिटुन डोळे पुन्हा बघावे,
असेच काही तुझ्यात आहे.
गुड मॉर्निंग
तिच्या सोबत असताना
मी तिचाच होऊन गेलो…
तिच्या सोबत नसताना मात्र
मी माझा सुद्धा नाही रहिलो…
गुड मॉर्निंग
आभाळावानी विशाल हृदय तुझे,
फुलपाखरावानी चंचल मन तुझे,
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे,
आरशा ही लाजे पाहून रूप तुझे.
प्रेम जर खरं असेल तर
कधीच दूर जाण्याची कारण
दिली जात नाहीत उलट जवळ
येण्यासाठी मार्ग काढला जातो
शुभ सकाळ
ज्या चहात साखर नाही
तो चहा पिण्यात मजा नाही
ज्या जीवनात प्रेम नाही
ते जगण्यात मजा नाही
शुभ सकाळ
तुझ्या प्रेमाची गोडी अमृतासारखी,
तुझ्या आठवणीत माझे दिवस रंगीत होतात,
तुझ्या बोलण्याची मिठीत माझी रात्री पार होते,
तुझ्यासोबतच्या प्रत्येक क्षणाची मला आस लागलेली आहे!
शुभ सकाळ
संबंधित बातम्या