Good Morning Marathi Message: सकाळी उठल्याबरोरबर आपण मोबाईल पाहतो. अशात जर आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीचा मेसेज आला, आणि त्यांच्याकडून सकाळच्या शुभेच्छा मिळाल्या तर आपला दिवस चांगला जातो. त्यामुळेच सकाळी उठल्याबरोबर एखाद्याला शुभ सकाळ बोलणे महत्वाचे असते. आपल्या एका मेसेजने एखाद्याचा संपूर्ण दिवस सकारात्मक बनतो. अलीकडे अनेक लोक व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा विविध सोशल मीडियावर मेसेज पाठवून सकाळच्या सुंदर शुभेच्छा देत असतात.
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने
प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं.
पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते.
मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सर्वच जोडतात.
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
शुभ सकाळ
स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.
शुभ सकाळ
दिवा कधीच बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका
चांगले कर्म करत रहा
तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील.
शुभ सकाळ
लोक म्हणतात तू नेहमी
आनंदी असतो….?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख
बघून मी जळत नाही
आणि माझं दुःख कुणाला
सांगत नाही.
शुभ सकाळ
जो डोळयातील भाव ओळखून
शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो.
शुभ सकाळ
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
शुभ सकाळ!
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे,
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत.
शुभ सकाळ
संबंधित बातम्या