Good Morning Wishes : रात्रीनंतर सकाळ यायचीच होती; ‘अशा’ खास अंदाजात प्रिय व्यक्तींना म्हणा गुड मॉर्निंग!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : रात्रीनंतर सकाळ यायचीच होती; ‘अशा’ खास अंदाजात प्रिय व्यक्तींना म्हणा गुड मॉर्निंग!

Good Morning Wishes : रात्रीनंतर सकाळ यायचीच होती; ‘अशा’ खास अंदाजात प्रिय व्यक्तींना म्हणा गुड मॉर्निंग!

Published Oct 06, 2024 07:19 AM IST

Good Morning Wishes In Marathi:प्रत्येक सकाळ ही खूप खास असते. ही खास सकाळ आणखी खास बनवायची असेल, तर ‘हे’ गुड मॉर्निंग मेसेज नक्की पाठवा.

Good Morning Wishes
Good Morning Wishes (shutterstock)

Good Morning Wishes In Marathi : सकाळची सुरुवात करताना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी फक्त दोन शब्द पुरेसे नसतात, विशेषत: जेव्हा आपल्या आयुष्यात काही महत्त्वाच्या व्यक्ती असतात. प्रत्येक सकाळ ही खूप खास असते. ही खास सकाळ आणखी खास बनवायची असेल, तर ‘हे’ गुड मॉर्निंग शुभेच्छा पाठवा आणि आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा. ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज आपलाच नव्हे तर, आपल्या प्रियजनांचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात.

 

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…

आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात

गणपती दर्शनाने करूया…

शुभ सकाळ!

 

--------------------------

 

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे,

जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड

कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.

शुभ सकाळ!

 

--------------------------

 

स्वतः साठी वेळ द्या, कारण

आपण आहोत तर जग आहे.

आणि अतिशय महत्वाचे,

दुसऱ्यासाठी वेळ द्या,

कारण ते नसतील तर

आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.

 

--------------------------

 

समाजात जो सरळ व सत्याने वागतो

त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.

कारण… जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी

अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.

परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.

पण, जी सरळ वाढलेली असतात,

त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव सोसावे लागतात.

शुभ सकाळ!

 

--------------------------

 

सगळ्यांनी साथ सोडली,

तेव्हा माणुसकी कळली,

पावसात गरमा गरम चहा प्यायलो,

तेव्हा आयुष्याची मजा कळली,

पैसे नसताना वेगळी किंमत,

पैसे असताना वेगळी किंमत,

तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गंमत कळली.

 

--------------------------

 

प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,

चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी…

आपण जरी भेटत नसू दररोज,

पण आपले चांगले विचार नेहमी

नक्की भेटत राहतील एकमेकांना…

माझी माणसं हिच माझी श्रीमंती…

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,

अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…

जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं

अगदी तुमच्यासारखी…!!

शुभ सकाळ

 

--------------------------

 

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,

फुलांच्या हळुवार सुगंधांनी

आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,

ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.

 

--------------------------

 

किती दिवसाचे आयुष्य असते?

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून-खेळून कारण

या जगात उद्या काय होईल

ते कोणालाच माहित नसते..

म्हणुन आनंदी रहा.

शुभ सकाळ!

Whats_app_banner