Good Morning Wishes: काही आठवणी विसरता येत नाहीत! जवळच्या व्यक्तींना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग-good morning wishes in marathi say good morning to your loved ones in a special way ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: काही आठवणी विसरता येत नाहीत! जवळच्या व्यक्तींना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग

Good Morning Wishes: काही आठवणी विसरता येत नाहीत! जवळच्या व्यक्तींना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग

Aug 22, 2024 05:03 AM IST

Marathi Good Morning Message: सकाळी पाठवलेला एक सुंदर मेसेज तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर गोंडस स्मित हास्य घेऊन येतो आणि त्यांचा दिवस आनंदी करतो.

Marathi Good Morning Message: जवळच्या व्यक्तींना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग
Marathi Good Morning Message: जवळच्या व्यक्तींना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग (Unsplash)

Good Morning Wishes In Marathi: सकाळी पाठवलेला एक सुंदर मेसेज तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर गोंडस स्मित हास्य घेऊन येतो आणि त्यांचा दिवस आनंदी करतो. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली करा आणि आपला संपूर्ण दिवस आनंदात घालवा, याच इच्छेने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग शायरी संदेश घेऊन आलो आहोत. हे गुड मॉर्निंग शायरी संदेश केवळ आपलाच नव्हे, तर आपल्या प्रियजनांनाचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात. चला तर मग, या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेसने एका सुंदर दिवसाची सुरुवात करूया.

 

काही आठवणी विसरता येत नाहीत,

काही नाती तोडता येत नाहीत,

माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत,

चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत,

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत,

पावल अडखळली तरी चालणं नाही थांबत,

अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आटत,

बोलण नाही झालं तरी आठवण नाही थांबत!

शुभ सकाळ!

 

--------------------------------------

 

अनेकदा राग आला की,

आपण लगेच अबोला धरतो.

पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन,

परिस्थिती अधिक चिघळत जाते.

शेवटी संवाद हाच सगळ्या सामास्यांवरचा

उत्तम उपाय आहे!

म्हणून संवादाचे दरवाजे बंद करू नका!

शुभ सकाळ

 

--------------------------------------

 

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये

खरी परीक्षा असते कारण,

समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,

तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो!

 

--------------------------------------

जबाबदारीची जाणीव असणारी माणसे,

फारशा सवाल-जवाबाच्या फंदात न पडता,

समोरील काम कसं पूर्ण करता येईल,

यासाठी ते प्रयत्न सुरू करतात.

म्हणूनच झिजलेले खांदे हे

बोलणाऱ्या ओठांपेक्षा श्रेष्ठ असतात!

शुभ प्रभात

 

--------------------------------------

 

आनंद हा एक ‘भास’ आहे,

ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे,

दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,

जो प्रत्येकाकडे आहे,

तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,

ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे!

शुभ सकाळ!

 

--------------------------------------

 

जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते,

तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते,

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल,

परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे!

शुभ सकाळ

 

--------------------------------------

 

जेवणाची चव ते चाखल्यानी कळते,

माणसाची गोडी त्याच्यातल्या माणुसकीने कळते!

हवी ती गोष्ट मिळत असेल तर किंमत राहत नाही,

खऱ्या कष्टाची चव तर घाम गाळल्यावरच कळते!

गुड मॉर्निंग

विभाग