Good Morning Wishes In Marathi: तुम्ही आपल्या प्रियजनांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यासाठी चांगला संदेश शोधत आहात का? तर, तुमचा शोध इथे थांबणार आहे. आम्ही तुमच्यासाठी काही खास गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. आपल्या जवळचे मित्र आणि आप्तस्वकीय आपल्यासाठी किती खास आहेत, हे तुम्ही या मेसेजेसमधून त्यांना नक्कीच सांगू शकता. पाहा ‘हे’ खास मेसेज…
डोळे उघडा, देवाचे नामस्मरण करा,
श्वास घ्या, थंड हवा श्वासात भरून घ्या,
मग, आपला मोबाईल हातात घ्या
आणि आम्हाला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवा!
शुभ सकाळ
आयुष्याची दुसरी सकाळ, आयुष्याचा दुसरा दिवस,
आयुष्यात किती क्षण आहेत याचा विचार करू नका,
प्रत्येक क्षणात आयुष्य किती आहे याचा विचार करा.
तुमचा दिवस चांगला जावो!
गुड मॉर्निंग
श्रावणाशिवाय पाऊस नाही,
सूर्यास्त झाल्याशिवाय रात्र नाही,
आता काय करावं तेच कळत नाही,
तुमची आठवण आल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही!
गुड मॉर्निंग
मी रात्रीच्या चांदण्याकडून सकाळ मागते,
फुलांकडून त्यांची चमक आणि रंग मागते,
देवाकडून रोजचा दिवस तुझ्मयासोबत मागते!
गुड मॉर्निंग
ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे,
फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते.
इतरांना तुम्ही फक्त नशिबवान माणूस वाटत असतात!
शुभ सकाळ
बदल हा तर निसर्गाचा नियम आहे.
फरक इतकाच आहे की, वेळेनुसार काहींची मने बदलतात तर काहींचे दिवस!
शुभ सकाळ
अडचण ही जिवापेक्षा मोठी नसते,
फक्त ती लायकीच्या लोकांसमोर मांडली पाहिजे
म्हणजे बरोबर पर्याय निघतात!
सुप्रभात
जी माणसं स्वत:कडे जे काही आहे त्यात खुश असतात,
तीच माणसं इतरांचही भलं कसं करावं हेच बघत असतात.
शुभ सकाळ
माणूस भावनेवर जगत असतो, नियमांवर नाही.
नियमांवर तर मशीन चालतात.
शुभ सकाळ
जे आपलं नाही त्यावर कधीही हक्क सांगू नका आणि
जो समजून घेऊ शकत नाही, त्याच्याकडे कधीही दुःख व्यक्त करू नका!
शुभ सकाळ
यश मिळवण्यासाठी इतरांना हरवण्याची किंवा जिंकण्याची गरज नाही
तुमच्या सारखी चांगली माणसं सोबत असणे म्हणजे जीवनातील स्पर्धा जिंकणे होय!
शुभ सकाळ
निवड, संधी आणि बदल या तीनही महत्वाच्या गोष्टी आहेत,
संधी दिसता निवड करता आली, तर बदल आपोआप होतो.
संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही,
त्याच्यात कधीच बदल घडत नाही…
शुभ सकाळ