Good Morning Wishes In Marathi: दिवसाची सुरुवात नेहमी उत्साहाने आणि नवीन उर्जेने करावी. प्रत्येक दिवस स्वतःमध्ये एक नवीन अनुभव आणि ऊर्जा घेऊन येतो. यामध्ये नवीन सकारात्मक गोष्टी असण्याची शक्यता असते. चांगली सुरुवात आपल्याला नव्या उंचीवर नेऊ शकते. गुड मोर्निंगची सुरुवात जर चांगल्या विचारांनी होत असेल, तर आणखी काय हवे. शिवाय तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा हीच सकारात्मक ऊर्जा देऊ शकता. त्यासाठी त्यांना फक्त एका मेसेजसोबत गुड मॉर्निंग म्हणण्याची गरज आहे. तुमच्या एका मेसेजने एखाद्याचा दिवस चांगला होऊ शकतो. तुम्ही सोशल मीडियावर शुभ सकाळचे हे मेसेज तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.
गोड माणसांच्या
आठवणींनी… आयुष्य
कस गोड बनतं.
दिवसाची सुरूवात
अशी गोड
झाल्यावर… नकळंत
ओठांवर हास्य खुलतं.
नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो न बदलो
पण वेळ नक्कीच बदलते…
सुप्रभात
मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध
हा येणारच, आणि आपली
माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच…
शुभ सकाळ
जर यशाच्या गावाला जायचेअसेल तर
अपयशाच्या वाटेनेच
प्रवास करावा लागेल.
शुभ सकाळ
माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने,
कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर,
एखादे वेळेस साथ देणार नाही ,
पण माणुसकी प्रेमळ स्वभाव
आणि आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही…
शुभ सकाळ
मनात खूप काही असतं सांगण्यासारखं
पण….
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवून अश्रू
लपवण्यातच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल
लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं…
जीवन हे असंच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं.
शुभ प्रभात
नाती तयार होतात
हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत
हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण
काढत आहोत हेच खूप आहे.
सुप्रभात
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.
शुभ सकाळ
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
सुखाची अपेक्षा असेल…
तर दुःख ही भोगावे लागेल…
प्रश्न विचारावयाचे असतील
तर उत्तर हि द्यावे लागेल…
हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच
लावता येत नाही जगात…
जीवनात यश हवे असेल…
तर संकटांना सामोरे जावेच लागेल.