Good Morning Wishes for Positive Energy: जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी प्रेमळ आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला १० सर्वोत्तम संदेश मिळतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.
तोंडी साखरेचा, गोडवा कायम असावा
मनात कुणाच्या, कधी राग नसावा
आयुष्यात जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून जावे व्यवहारी, फायदे तोटे
सुख क्षणांचे मणी, हळुवार प्रेमाने ओवावे,
आनंदी सुरांनी, मनास छेडावे.
फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर,
मुळीच कमीपणा वाटू देवू नका.
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही.
शुभ सकाळ!
लोक म्हणतात तू नेहमी
आनंदी कसा असतो….?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख
बघून मी जळत नाही,
आणि माझं दुःख कुणाला
सांगत नाही!
शुभ सकाळ!
जो डोळयातील भाव ओळखून
शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो.
शुभ सकाळ!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
गुड मॉर्निंग
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ!
जगा इतकं की आयुष्य कमी पडेल,
हसा इतके की आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की,
परमेश्वराला देणे भागच पडेल.
शुभ सकाळ
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
शुभ सकाळ!
मला श्रीमंत होण्याची गरज नाही..
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती.
शुभ सकाळ!
दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो,
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे.
जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या