Good Morning Wishes: एक सुंदर सकाळ तुमचं स्वागत करत आहे! ‘हे’ मेसेज पाठवून प्रियजनांना म्हणा गुड मॉर्निंग-good morning wishes in marathi say good morning to your loved ones by sending this message ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: एक सुंदर सकाळ तुमचं स्वागत करत आहे! ‘हे’ मेसेज पाठवून प्रियजनांना म्हणा गुड मॉर्निंग

Good Morning Wishes: एक सुंदर सकाळ तुमचं स्वागत करत आहे! ‘हे’ मेसेज पाठवून प्रियजनांना म्हणा गुड मॉर्निंग

Sep 15, 2024 07:08 AM IST

Good Morning Wishes In Marathi:सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो.

Good Morning Messages In Marathi
Good Morning Messages In Marathi

Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.

 

कोण म्हणतो की माणूस रिकाम्या हाताने येतो,

आणि रिकाम्या हाताने जातो?

तसं अजिबात नाही, माणूस नशीब घेऊन येतो 

आणि कर्म घेऊन निघून जातो!

 

---------------------------

 

पायाची जखम आणि लहान विचार,

आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत,

तुटलेले पेन आणि इतरांचा मत्सर 

आपल्याला स्वतःचे नशीब लिहू देत नाही!

गुड मॉर्निंग

 

---------------------------

 

दवाचे थेंब फुलांना भिजवत आहेत,

थंड वारे ताजेपणा जागृत करत आहेत,

ये आणि या अनुभवात सामील हो,

एक सुंदर सकाळ तुझं स्वागत करत आहे!

शुभ सकाळ

 

---------------------------

 

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,

एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला

तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,

कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,

कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे,

एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,

म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.

शुभ सकाळ

 

 

जिव्हाळायाचे ऋणानुबंध

असल्याशिवाय कोणी कोणाच्या

आयुष्यात येत नाही.

सुप्रभात!

 

---------------------------

 

आपण जे देतो ते आपल्याकडे

परत येतं त्यामुळे चांगलं द्या,

चांगलच मिळेल.

शुभ सकाळ!

 

---------------------------

 

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,

फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील…

शुभ सकाळ!

 

---------------------------

 

दुसऱ्याचं आयुष्य आपल्याला खूप सहज 

आणि सोपं वाटत असतं, 

कारण त्यात आपली भूमिका 

फक्त प्रेक्षकाची असते..!

 

---------------------------

 

जगात सगळं काही विकत घेता येतं, 

पण कुणाचं मन आणि त्याची भावना 

कुणीच विकत घेऊ शकत नाही. 

लक्षात ठेवा, जर तुम्ही दोष लपवला, 

तर तो मोठा होतो आणि 

जर दोष कबूल केला तर तो नाहीसा होतो!

शुभ सकाळ

Whats_app_banner
विभाग